Bibwewadi Police | चौघींसोबत झेंगाट अन् 53 जणींसोबत लग्नाची बोलणी करत 53 लाखांना गंडा, पोलिसांकडून भामट्याला अटक; जाणून घ्या प्रकरण

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन (Policenama online) – Bibwewadi Police । सोशल मीडियावर तरुणींना हेरून आणि नात्यातील तरुणांना नोकरीचे आमिष दाखवून फसवणाऱ्या भामट्याला बिबवेवाडी पोलिसांनी (Bibwewadi Police) अटक केली आहे. भामटयाने तरुणींची ओळख करून त्यांच्या नात्यातील तरूणांना लष्करात भरती करण्याच्या आमिषाने तब्बल 53 जणींना गंडा घातला. तसेच, 4 तरुणीसोबत घरोबा करून आर्थिक गंडा घालणाऱ्या व तब्बल 53 तरूणींना लग्नाचे आमिष दाखवून बोलणी केल्याचे समोर आले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, योगेश दत्तू गायकवाड (Yogesh Dattu Gaikwad) (रा. कन्नड, औरंगाबाद) असे त्या फसवणाऱ्या भामट्याचे नाव आहे. त्याला पोलिसांनी अटक केलीय. या प्रकरणावरून एका तरुणीने बिबवेवाडी पोलीस ठाण्यात (Bibwewadi Police) फिर्याद दिली आहे. तर, जानेवारी 2020 मध्ये फिर्यादी तरुणी (रा. मूळची आळंदी देवाची) ती आईच्या उपचारासाठी बिबवेवाडीतील एका रुग्णालयात आली होती. त्यावेळी परिसरातील स्थानकावर बसची वाट पाहत असताना आरोपीचे (योगेश गायकवाड) आधारकार्ड तरुणीला सापडले होते. यानंतर त्या फिर्यादी तरुणीने आवाज देत योगेशला आधार कार्ड दिले. त्यानंतर त्याने फिर्यादी तरुणी आणि तिच्या आईसोबत चांगलीच ओळख वाढविली. लष्करामध्ये असल्याचे बनावट ओळखपत्र दाखवून तरुणीच्या आईचा विश्वास वाढवला.

Join our Policenama WhatsApp Group Link , Telegram,
facebook page and Twitter for every update

यानंतर त्या आरोपी योगेश गायकवाडने (Yogesh Gaikwad) तरुणीबरोबर खोटा विवाह करून तिच्या भावाला लष्करात भरती करण्यासाठी दोन लाख रुपयाची मागणी केली. ते रुपये देखील त्याला मिळाले. यानंतर त्या तरुणीच्या गावातील युवकांचा विश्वास संपादित करून आरोपी योगेशने आतापर्यंत 53 तरूणींबरोबर ओळख वाढवून प्रत्येकी 1 लाख रूपये प्रमाणे 53 लाखांची फसवणूक केल्याचे उघडकीस आले. याप्रकरणी पोलिसांनी त्याला अटक केली आहे.

या दरम्यान, आरोपी योगेश हा पुण्यातील विविध ठिकाणी फिरत होता. आरोपीने तरुणींना जाळ्यात अडविले आहे. बसस्थानकावर एकट्या तरुणींना गाठून विश्वास संपादन करून मोबाईल नंबर घेत होता. तसेच, सोशल मीडिया, विविध अ‍ॅप, फेसबुक, इन्स्टाग्रामद्वारे ओळख वाढवून तरुणींना लग्नाचे आमिष दाखवत त्यांना मोह दाखवत होता. कुटुंबातील मुलाला लष्करात भरती करण्याच्या आमिषाने 2 ते 3 लाखाला गंडा घालायचा. अखेर आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. ही कारवाई पोलीस उपायुक्त नम्रता पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील झावरे, पोलीस निरीक्षक अनिता हिवरकर, API राजेश उसगावकर, अमित पुजारी, सतीश मोरे, तानाजी सागर, श्रीकांत कुलकर्णी, अतुल महांगडे, अमोल शितोळे, दीपक लोधा, राहूल कोठावळे यांच्या पथकाने केली.

Join our Policenama WhatsApp Group Link , Telegram,
facebook page and Twitter for every update

Web Title : Bibwewadi Police arrest one in cheating case

हे देखील वाचा

MLA Pratap Saranaik । आ. प्रताप सरनाईकांची विधानसभा अधिवेशनात मोठी मागणी, म्हणाले – ‘… नाहीतर मला क्लिन चिट द्या’

Gold Price Today । सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा वाढ; जाणून घ्या आजचे दर

IPL 2022 | आयपीएलच्या पुढील पर्वासाठी डिसेंबरमध्ये खेळाडूंचा महालिलाव; दोन नवे संघही येणार

Pune Police News | पुणे पोलिसांकडून माहिती अधिकार कार्यकर्ता रवींद्र बर्‍हाटेला अटक