‘त्या’ चित्रपटातील बिग बींचा लुक लीक झाला…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – चित्रपट ‘बदला’ च्या यशानंतर आता बॉलीवूडचा मेगास्टार अमिताभ बच्चन लवकरच ‘चेहरे’ चित्रपटामध्ये दिसणार आहे. या चित्रपटात अमिताभ सोबत इमरान हाशमी देखील दिसणार आहे. त्या दोघांना सोबत काम करतांना बघण्यासाठी त्यांचे फॅन्स खूप उत्सुक आहेत. बॉलीवूडच्या अहवालानुसार, चित्रपटाची शूटिंग काही दिवसांपूर्वी मुंबई मध्ये चालू झाली आहे. चित्रपटचे दिग्दर्शक रुमी जाफरी आहे. दरम्यान, या चित्रपटाशी संबंधित अमिताभची काही चित्रे सोशल मीडियावर लीक झाली आहेत.

big-B
चित्रपट ‘चेहरे’ च्या सेट वरून अमिताभ बच्चनचा लुक लीक झाला आहे. या व्यतिरिक्त त्याचे आणखी काही  फोटोज समोर आले आहेत. हा फोटो कॅण्डल लाईट मध्ये घेतला आहे, त्या फोटो मध्ये बिग बीचा नवीन लुक दिसतो आहे. चित्रपटाच्या कथे बद्दल आणखी कोणतीच माहिती आली नाही. चित्रपटात अमिताभ-इमरानच्या व्यतिरिक्त कीर्ति खरबंदा, रिया चक्रवर्ती, सिद्धांत कपूर, दृष्टिमन चक्रवर्ती आणि  अनू कपूर दिसून येतील. हा चित्रपट २० फेब्रुवारी २०२० ला प्रदर्शित होणार आहे.  ‘चेहरे’ चित्रपटाच्या व्यतिरिक्त अमिताभ बच्चन  अयान मुखर्जीचा चित्रपट  ‘ब्रह्मास्त्र’ मध्ये दिसून येणार आहे. या चित्रपटात बिग बी सोबत रणबीर कपूर, आलिया भट्ट, डिंपल कपाड़िया, नागार्जुन आणि मौनी राय मुख्य भूमिका करणार आहे.

big-B2