home page top 1

‘BIG BOSS MARATHI’ या शोला ‘कायदेशीर कारवाई’चे गालबोट ? ‘या’ अभिनेत्रीने दिली धमकी

मुंबई : वृत्तसंस्था – अल्पावधीत लोकप्रिय ठरलेल्या ‘बिग बॉस मराठी’ या शोला आता ‘कायदेशीर कारवाई’चे गालबोट लागले आहे. विशेष म्हणजे ‘करार’ करून एकगठ्ठा रक्कम घेऊन या शोमध्ये सहभागी होणाऱ्या अभिनेत्रीने चक्क ‘बिग बॉस’ला कायदेशीर कारवाईची धमकी दिली आहे. त्यामुळे या शोला वेगळे वळण मिळते कि काय ? हा प्रश्न निर्माण झाला आहे.

मराठी बिग बॉस शोच्या पहिल्या सत्राला मिळालेला प्रतिसाद पाहता यंदा दुसऱ्या सत्रामध्ये टीआरपीचा आलेख उंचावण्याची चिन्हे असताना हा शो वादग्रस्त ठरला आहे. शिवानी सुर्वे या अभिनेत्रीने थेट बिग बॉसला लक्ष्य करून कायदेशीर कारवाईचा दिलेला इशारा पाहता, या शोच्या नियमांना सहभागी होणारे कलाकार जुमानत नसल्याचा संदेश प्रेक्षकांपर्यंत पोहचल्याने आता ‘बिग बॉस’ कोणती भूमिका घेतात याकडे प्रेक्षकांचे लक्ष लागले आहे. विविध क्षेत्रातील सहभागी स्पर्धकांमधील मैत्री, प्रेम, वाद-विवाद, भांडण, नॉमिनेशन टास्क अशा सर्वच गोष्टी ‘बिग बॉस’ मराठीच्या घरात बघायला मिळत आहेत मात्र घरातील नियम पाळले नाहीत, वारंवार उल्लंघन झाले तर बिग बॉसकडून सदस्यांना दमही दिला जातो; पण यंदाच्या सत्रात शिवानी सुर्वे ही अभिनेत्री वादग्रस्त ठरली आहे. सदस्यांवर हात उगारणे, लाथ मारणे, शिव्या देणे आणि बिग बॉसच्या नियमांची पायमल्ली करणे हे प्रकार शिवानीकडून सातत्याने झाल्याने सूत्रसंचालक महेश मांजरेकर यांनी शिवानीची ‘शाळा’ ही घेतली होती आणि शांत राहण्याचा सल्लाही दिला होता ; पण १२ जून रोजी शिवानीने थेट बिग बॉस पर्यायाने या शोला कायदेशीर कारवाईच्या कक्षेत आणणार अशी धमकी दिल्याने आता या शोला वेगळे वळण लागणार आहे. शिवानीने १२ जूनला प्रसारित झालेल्या एपिसोडमध्ये ‘मला घरातून बाहेर काढा नाहीतर मी बिग बॉसवर कारवाई करेन’ असे म्हणत थेट धमकीच दिली एकदा नाही तर दोन-चार वेळा कायदेशीर कारवाईचा उल्लेख शिवानीने केला.

दरम्यान मध्यरात्री दोन वाजता बिग बॉसने शिवानी आणि नेहाला कनफेशन रुममध्ये बोलावले. शिवानीला तिचे म्हणणे मांडण्याची संधी दिली. बिग बॉसने शिवानीला कायद्याच्या चौकटीतच राहून निर्णय होईल असे सांगताच लगेचच शिवानीने राग अनावर झाल्याने चुकून बोलून गेल्याचे स्पष्टीकरण दिले आणि आर्थिक अडचण असल्याने कायदेशीर कारवाई परवडणार नाही. आणखी काम करायचे आहे. त्यामुळे कायद्याच्या मार्गाने न जाता आपण सामोपचाराने मार्ग काढावा अशी विनंती शिवानीने बिग बॉसला केली आहे. येत्या शनिवारी विकेंडचा डावमध्ये महेश मांजरेकर काय भूमिका घेतात हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

आरोग्य विषयक वृत्त

उपाशीपोटी ‘ही’ ४ फळे खा, नेहमी राहाल निरोगी

योग्य काळजी घेतली तर ‘हा’आजार होणार नाही,तुम्ही राहा अलर्ट

किचनमधील ‘या’ ९ भाज्यांचा ‘व्हायग्रा’सारखाच परिणाम

Loading...
You might also like