खुशखबर ! सोन्या-चांदीच्या किंमतीत मोठे बदल, ‘स्वस्त’ झालं Gold तर चांदीत 1000 पेक्षा जास्त ‘घसरण’

नवी दिल्ली : सणांचा हंगाम सुरू होण्यापूर्वी सोने-चांदी स्वस्त होऊ लागले आहे. लागोपाठ दुसर्‍या दिवशी सोने-चांदीच्या किंमतीत घसरण झाली आहे. आज देशभरातील सराफा बाजारात सोने-चांदीची चमक थोडी कमी झाली. गुरुवारी सकाळी 24 कॅरेट गोल्डचा भाव बुधवारच्या तुलनेत 366 रुपये प्रति 10 ग्रॅम घसरून खुला झाला आणि 51511 रुपयांवर बंद झाला. तर चांदी 65218 रुपये प्रति किलोवर आली आहे.

दिल्ली सराफा बाजारात सोने 608 रुपयांनी उतरले
एचडीएफसी सिक्युरिटीजनुसार कमजोर अंतरराष्ट्रीय निकालांसह सोन्याची किंमत गुरूवारी राष्ट्रीय राजधानीत 608 रुपये घसरून 52,463 रुपये प्रति 10 ग्रॅम झाली. मागील व्यवसायात सोने 53,071 रुपये प्रति 10 ग्रॅमवर बंद झाले होते. तर चांदी सुद्धा गुंतवणुकदारांना आकर्षित करण्यात अयशस्वी ठरली. आज ती 1,214 रुपयांनी उतरून 69,242 रुपये प्रति किलोग्रॅमवर आली.

एचडीएफसी सिक्युरिटीज सीनियर अनालिस्ट (कमोडिटीज) तपन पटेल यांनी म्हटले की, दिल्लीत 24 कॅरेट सोन्याच्या किंमतीत 608 रुपये घसरण झाली. अंतरराष्ट्रीय बाजारात सोच्या किंमत 1,943.8 डॉलर प्रति औंस आणि चांदी 26.83 डॉलर प्रति औंसवर पोहचली. मोतीलाल ओसवाल फायनान्शियल सर्व्हिसेसचे उपाध्यक्ष (कमोडिटीज रिसर्च) नवनीत दमानी यांनी म्हटले की, अमेरिकन फेडरल ओपन मार्केट कमिटीच्या बैठकीत 2023 पर्यंत व्याजदरात शून्याच्या जवळपास ठेवण्याचे संकेत मिळाल्यानंतर डॉलर इंडेक्समध्ये मजबूती आली. याचा परिणाम म्हणून गोल्डमध्ये विक्री दिसून आली.

धातु 17 सप्टेंबचा रेट (रुपये/10 ग्र्रॅम) 16 सप्टेंबरचा रेट (रुपये/10 ग्रॅम)
रेटमध्ये बदल (रुपये/10 ग्रॅम)

गोल्ड 999 (24 कॅरेट) 51511 51797 -286
गोल्ड 995 (23 कॅरेट) 51305 51590 -285
गोल्ड 916 (22 कॅरेट) 47184 47446 -262
गोल्ड 750 (18 कॅरेट) 38633 38848 -215
गोल्ड 585 ( 14 कॅरेट) 30134 30301 -167
सिल्व्हर 999 65218 रू/कि. 65883 रू./कि. -665 रू/कि.