home page top 1

खूशखबर ! सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण

नवी दिल्ली : पोलीसनामा ऑनलाइन – सोने आणि चांदी खरेदी करण्यासाठी आनंदाची बातमी. गुरुवारी महागलेल्या सोन्याच्या किंमतीमध्ये आज मोठी घसरण झाली. सोन्या बरोबरच चांदीच्या दरात देखील मोठी घसरण झाली आहे. आज सोन्याच्या दरात ४०० रुपयांनी तर चांदी १२५ रुपयांची घसरण झाली. सोन्यामध्ये घसरण होऊन ३५ हजार ४०० रुपये प्रति १० ग्रॅम सोनं झाल आहे. गुरुवारी सोने ९३० रुपयांनी महागले होते.

ऑल इंडीया सराफ असोसिएशननुसार, स्थानिक व्यापाऱ्यांकडू मागणी कमी झाल्याने ही घट झाली आहे. न्युयॉर्कमध्ये सोन्याच्या दरात वाढ होऊन सोने १,४०९.४० डॉलर प्रति औंस झाले आहे. तर चांदी १५.२१ डॉलर प्रति औंस झाले आहे. राजधानी दिल्ली मध्ये ९९.९ टक्के शुद्ध सोने आणि ९९.५ टक्के शुद्ध सोने अनुक्रमे ३५ हजार ४०० आणि ३५ हजार २३० रुपये प्रति १० ग्रॅम आहे. तर ८ ग्रॅमची गिन्नी २७ हजार ४०० प्रति एकक राहिली. स्थानिक व्यापाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, स्थानिक ज्वेलर्सकडून सोन्या-चांदीची मागणी कमी आल्याने दर कमी झाले आहेत.

चांदीच्या दरामध्ये १२५ रुपयांची घसरण झाली. तर चांदीच्या नाण्यांच्या किमंती ८१ हजार आणि विक्री ८२ हजारांवर स्थिर राहिली. चांदीतही १२५ रुपयांनी घसरण होऊन चांदी ३९ हजार ७५ रुपये प्रति किलोग्रॅम झाली आहे.

आरोग्यविषयक वृत्त

दात पांढरेशुभ्र हवे असतील तर लिंबाचा असा करा उपयोग

पावसाळ्यात आलू बुखार आवश्य खा, यात आहेत भरपूर ‘व्हिटामिन्स’

अपचनाची समस्या अशी दूर करा, हे आहेत प्रभावी ६ घरगुती उपाय

डोकेदुखीने त्रस्त आहात का ? हे घरगुती रामबाण उपाय करा

‘मक्याचं’ कणीस खाल्यावर लगेच पाणी पिणे पडेल ‘महागात’

‘या’ ५ कारणांमुळे होते ‘किडनी’ खराब, जाणून घ्या

Loading...
You might also like