जळगावमध्ये भाजपला मोठं खिंडार ! मनपातील आणखी 3 नगरसेवकांचा शिवसेनेत प्रवेश, आतापर्यंत 57 पैकी 30 माननीयांच्या हाती शिवबंधन

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – शिवसेने(Shiv sena)ने भाजपला मोठा धक्का दिला आहे. काही दिवसांपूर्वी जळगाव महानगरपालिकतील भाजपच्या 5 नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केला होता. त्यानंतर आता आणखी तीन नगरसेवकांनी भाजपला सोडचिठ्ठी देऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थिती शिवसेनेत प्रवेश केला आहे. मुख्यमंत्र्यांनी नगरसेवकांच्या हातात शिवबंधन बांधून त्यांना शिवसेनत प्रवेश दिला. या नगरसेवकांना शिवसेनेत प्रवेश देण्यात मंत्री गुलाबराव पाटील यांची महत्त्वाची भूमिका आहे.

जळगाव महानगरपालिकेत भारतीय जनता पार्टीचे एकूण 57 नगरसेवक होते. त्यापैकी 30 नगरसेवकांनी आपल्या पदाचा राजीनामा देत शिवसेनेत प्रवेश केला आहे. आता आणिखी 11 नगरसेवक शिवसेनेच्या वाटेवर असल्याची माहिती मिळत आहे.

भाजपच्या हातून सत्ता जाणार ?

भाजपकडे 57 नगरसेवकांसह बहुमत होते. मात्र 30 नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. त्यातच आणखी 11 नगरसेवक जर शिवसेनेत गेले तर भाजपकडे केवेळ 16 नगरसेवक राहतील. दोन दिवसांपूर्वी जळगाव मनपातील एकूण सात नगरसेवकांनी गुलाबराव पाटील यांच्याह मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी दाखल होत शिवसेनेत प्रवेश केला.

दोन दिवसांपूर्वी या नगरसेवकांनी पक्षांतर केलं

पियूष महाजन, मुकेश वानखेडे, संतोष कोळी, शबाना अब्दूल अरिफ, नुसरत मेहबूब खान, बिल्कीज अमानुल्ला खान

READ ALSO THIS :

आता 1 जूनपासून देशांतर्गत विमान प्रवास महागणार, सरकारनं 16 टक्क्यांपर्यंत वाढवले भाडे; जाणून घ्या नवे दर

आता 1 जूनपासून देशांतर्गत विमान प्रवास महागणार, सरकारनं 16 टक्क्यांपर्यंत वाढवले भाडे; जाणून घ्या नवे दर

EDLI Benefits : PF खातेधारकाच्या अकाली मृत्यूनंतर कुटुंबियांना मिळते 7 लाख रुपयांची रक्कम, जाणून घ्या ‘क्लेम’बाबत

‘ओबीसींच्या राजकीय आरक्षणावर घाला हे भाजपचे पाप, फडणवीसांचे आरोप म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा !’