मोठी बातमी ! ‘हिमालय’पूल आता दिसणार नाही

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस रेल्वे स्थानकाजवळ पादचारी पूलचा भाग कोसळ्याची घटना समोर आली. या हिमालय पूलाच्या दुर्घटनेत 6 जण ठार झाले तर अनेकजण गंभीर जखमी झाले आहेत. गुरुवारी रात्री साडे सातच्या सुमारास ही घटना घडली. हा सर्वच पूल आता आज संध्याकाळपर्यंत काढून टाकण्यात येणार आहे असे सांगण्यात आले आहे.

सीएसएमटी स्थानकाबाहेर असाणार हा हिमालय पूल कोसळल्यानंतर पहाटेपर्यंत रस्त्यावरील डेब्रीज हटवण्याचे काम सुरु होते. या घटनेनंतर दादाभाई नौरोजी मार्गावरील वाहतूक जे. जे. उड्डाणपूल आणि सीसीएमटी या दोन्ही बाजूची वाहतूक बंद करण्यात आली होती. अद्यापही हा मार्ग वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला आहे. या घटनेनंतर दक्षिण मुंबईतील वाहतूक वळवण्यात आली.

गुरुवारी रात्रीपासून महापालिकेने डेब्रीज हटवण्याचे काम सुरु केले होते. शुक्रवारी पहाटे चार वाजेपर्यंत हे काम सुरू होते. पहाटेपर्यंत कोसळलेल्या पूलाचा सिमेंटचा स्लॅब काढण्यात आला. स्लॅब काढल्यानंतर जमा झालेला मातीचा ढिगारा हटवण्यात आला. यानंतर आता येथे केवळ पुलाचा सांगडाच शिल्लक आहे. आता हा सांगाडा काढण्याचा निर्णय घेतला आहे असे समजत आहे.

पुलाचा भाग कोसळल्यामुळे सीएसएमटी स्थानकातून ते टाइम्स ऑफ इंडिया कार्यालय, अंजुमन-ए-इस्लाम शाळेच्या दिशेने येण्यासाठी पादचाऱ्यांसाठी पर्यायी मार्गदेखील तयार करण्यात आला आहे. मुख्य म्हणजे या ठिकाणी झेब्रा क्राॅसिंग आखण्यात येणार आहे. या घटनेनंतर रस्त्याच्या मध्यभागी असणाऱ्या दुभाजकाचा काही भागही काढण्यात आला.

दरम्यान, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज या घटनेतील जखमींची भेट घेत त्यांची विचारपूस केली. यानंतर त्यांनी माध्यमांशी बोलताना या घटनेच्या उच्चस्तरीय चौकशीचे आदेशदेखील त्यांनी यावेळी दिले.

ह्याहि बातम्या वाचा –

..तर राष्ट्रवादीवाले देशद्रोही : डॉ. सुजय विखे

लोकसभा निवडणूक लढण्याबाबत मायावतींनी घेतला मोठा निर्णय

कोर्टात न्यायाधीशांना शिव्या देणारा उद्योजक गजाआड

‘पूल दुर्घटनेला पादचारीच जबाबदार’ : भाजप महिला नेता बरळली