नोकियाचा प्लांट झाला बंद ! 42 कर्मचारी ‘कोरोना’ पॉझिटिव्ह !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  मागील दशकांमध्ये भारतात सर्वाधिक मोबाईल फोन बनवणारी कंपनी नोकियाने आपल्या तामिळनाडु येथील मॅन्युफॅक्चरिंग प्लांटमध्ये 42 कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह सापडल्याने हा प्लांट बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. चीनी स्मार्टफोन निर्माता ओप्पोने 9 कोरोना कर्मचारी पॉझिटिव्ह सापडल्यानंतर फॅक्टरी पुढील आदेशापर्यंत बंद केली आहे. मात्र, यानंतर ओप्पोने आपल्या सर्व कर्मचार्‍यांची कोरोना टेस्ट सुरू केली होती. लॉकडाऊननंतर 8 मे रोजी कंपनीचे कामकाज पुन्हा सुरू केले होते.

रॉयटर्सच्या वृत्तानुसार नोकियाने मागच्या आठवड्यात तमिळनाडुचा श्रीपेरंबुदूर येथील प्लांट बंद केला होता. नोकियाने अधिकृत माहिती तेव्हा दिली जेव्हा, कंपनीचे काही कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह आढळले.

कंपनीने अजूनपर्यंत या गोष्टी खुलासा केलेला नाही की, किती कर्मचार्‍यांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. परंतु, रॉयटर्सच्या वृत्तात दावा करण्यात आला आहे की, पॉझिटिव्ह केसची संख्या 42 आहे.

कंपनीचे म्हणणे आहे की, आम्ही अगोदरच सोशल डिस्टन्सिंगचे पालन करणे आणि इतर बदल लागू केले होते. येथील कँटीनमध्ये सुद्धा सर्व खबरदारी घेण्यात येत होती.

सुरक्षेचे नियम लक्षात घेता, मागच्या काही दिवसात फॅक्टरीत पुन्हा परिचालन सुरू केले होते. नोकियाने अपेक्षा व्यक्त केली आहे की, आम्ही प्रतिबंधित स्तरावर आपल्या कर्मचार्‍यांच्या सोबत लवकरच प्लांटमध्ये उत्पादन सुरू करू.