भारत-पाकिस्तान क्रिकेट सामना होण्यापुर्वीच चाहत्यांना मोठा ‘धक्‍का’

लंडन : वृत्तसंस्था – आयसीसी क्रिकेट वर्ल्डकपला इंग्लंडमध्ये सुरुवात झाली असून सगळेच संघ जिंकण्यासाठी आपल्या प्राणाची बाजी लावत आहे. सगळ्याच संघाचे जवळपास तीन सामने झाले आहेत. त्यात ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड गुणतालिकेत सध्या सर्वात वरच्या स्थानावर आहे. ऑस्ट्रेलिया विरुद्ध झालेल्या सामन्यात भारताने शानदार ३६ धावांनी विजय मिळवत आपला दुसरा विजय साजरा केला.
मात्र पाऊस हि एक मोठी चिंता सर्वच संघांसाठी ठरत आहे.

याआधी देखील पाकिस्तान आणि बांगलादेश यांच्यातील सामना पावसामुळे रद्द झाला होता. त्यामुळे गुणतालिकेत देखील याचा फटका संघाना बसताना दिसून येत आहे. याचा फटका लीग स्टेजमध्ये सर्वात शेवटी जास्त जाणवणार आहे. त्यामुळे मोठ्या संघांची चिंता यामुळे वाढली आहे. भारताचा उद्या न्यूझीलंडबरोबर सामना होणार आहे. मात्र पाऊसामुळे दोन्ही संघाना संघाना सराव देखील करता आला नाही. त्यामुळे उद्या देखील या ठिकाणी पावसाची शक्यता वर्तवण्यात आल्याने या सामन्याला देखील पावसाचा फटका बसू शकतो. त्याचबरोबर सोमवारी झालेला विंडीज आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील सामना देखील पावसामुळे रद्द करण्यात आला होता. त्यानंतर काल झालेला श्रीलंका आणि बांगलादेश यांच्यातील सामना देखील रद्द करण्यात आला होता. त्यामुळे आता भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील सामन्यात पाऊस न पाडण्याचीच प्रार्थना भारतीय संघ तसेच भारतीय पाठीराखे देखील करत असणार हे मात्र खरे आहे.

भारत-पाक सामन्याला फटका
या सगळ्यात रविवारी होणारा भारत आणि पाकिस्तान या दोन पारंपरिक प्रतिस्पर्ध्यांमधील सामन्याकडे सर्व पाठिराख्यांचे लक्ष लागून आहे. हा सामना मॅंचेस्टरच्या ओल्ड ट्रैफोर्ड या मैदानावर खेळला जाणार आहे. रविवारी येथे पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवल्याने दोन्ही देशांचे चाहते निराश झाले आहेत. या सामन्यासाठीची तिकिटे हि ४८ तासात विकली गेल्याने भारतीय चाहते आणि पाठीराखे या सामन्यासाठी खूप उत्सुक असल्याचे दिसून येत असताना पावसामुळे त्यांच्या आनंदावर विरजण पडण्याची शक्यता आहे.

आरोग्यविषयक वृत्त

फिट राहण्यासाठी दीपिकाचा नवीन फंडा

डासांमुळे होणाऱ्या या आजारांना ‘घरगुती’ पद्धतीने घाला आळा

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like