..हेच विखेंचे संस्कार का ?

सिनेअभिनेत्री दीपाली सय्यद यांचा संतप्त सवाल

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन – गुंडेगाव येथील सभेत बोलताना खासदार सुजय विखे यांनी साकळाई पाणी योजनेच्या प्रश्नावर बोलताना मला उद्देशून देखणा माणूस आला, तर पहायला जा, असे वक्तव्य केले होते. एखाद्या स्त्रीबद्दल असे बोलणे, हे खासदार सुजय विखे यांचे संस्कार आहेत का, असा सवाल सिनेअभिनेत्री दीपाली सय्यद यांनी आज पत्रकारांशी बोलताना उपस्थित केला.

सय्यद म्हणाल्या की, विखे यांच्या घरी आई-बहीण बायको नाही का ? तरी एका स्त्री बद्दल असे शब्द का वापरतात ? हा समस्त स्त्रीयांचा अपमान आहे. त्यांनी माझी माफी मागावी. अन्यथा त्यांच्या विरोधात राज्य महिला आयोगाकडे लेखी तक्रार करण्यात येईल. लोकसभा निवडणुकीपूर्वी मला बहीण म्हणणाऱ्या सुजय विखे यांनी आक्षेपार्ह शब्द वापरून त्यांचे संस्कार दाखवले आहेत.

साकळाई पाणी योजनेसाठी माझा लढा यापुढेही सुरूच राहील. साकळाईच्या लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना पाण्याचा लाभ मिळाला पाहिजे, या मताची मी आहे. त्यासाठी शेवटपर्यंत संघर्ष करत राहील, अशा पद्धतीने जर राजकीय व्यक्तीने विधाने सुरू केली, तर कृती समितीकडून एखादा उमेदवार श्रीगोंदा मतदारसंघातून निवडणूक रिंगणात उभा केला जाईल, असेही सय्यद म्हणाल्या.