Big Boss 14 | राखी सावंत नंतर आता अर्शी खान रचणार स्वयंवर ! लवकरच होणार कुणाची तरी ‘वधू’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Big Boss 14 | बिग बॉस 14 ची स्पर्धक अर्शी खान सातत्याने प्रसिद्धीच्या झोतात आहे. ती आपली छायाचित्रे आणि व्हिडिओद्वारे फॅन्सशी कनेक्टेड राहते. तिच्या छायाचित्रांना आणि व्हिडिओंना चाहत्यांचा मोठा प्रतिसाद मिळतो. अर्शी खान पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. अर्शीच्या चाहत्यांसाठी एक खुशखबर आहे, ती पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर दिसणार आहे. रिपोर्टनुसार, अर्शी खानचे स्वयंवर होणार आहे. (Big Boss 14 )

अर्शीचे होऊ शकते स्वयंवर
ई-टाइम्सच्या रिपोर्टनुसार, आएंगे तेरे सजना च्या सीझन 1 मध्ये अर्शी खान लवकरच दिसू शकते. अर्शीचे हे स्वयंवर राहुल महाजन होस्ट करताना दिसेल. राहुल महाजन स्वत: देखील यापूर्वीच्या स्वयंवरचा भाग होता. ई-टाइम्सने सूत्रांच्या संदर्भाने लिहिले आहे की, ‘मेकर्सने शो ची तयारी सुरू केली आहे. शहनाज गिलच्या स्वयंवरानंतर, चॅनलला अशी व्यक्ती हवी आहे, जी टीआरपी हिट करू शकते. अशावेळी अर्शी खान एक चांगले नाव आहे. काही काळापूर्वी अर्शी खानने मुंबईत आपले घर खरेदी केले आहे.

टीव्हीवर टेलीकास्ट झाले हे स्वयंवर
अर्शीची ही बातमी ऐकून तिचे चाहते खुप आनंदी झाले आहेत. ते अर्शीच्या स्वयंवराची अतुरतेने वाट पहात आहेत. सर्व प्रेक्षकांना पुन्हा एकदा आर्शीला टेलिव्हिजनवर पहायचे आहे. बिग बॉस 13 संपल्यानंतर शहनाज गिल आणि पारस छाबडाचे स्वयंवर टेलिव्हिजनवर टेलिकास्ट झाले होते. या शोचा टीआरपी खुप कमी होता. टीव्हीवर आतापर्यंत राखी सावंत, राहुल महाजन आणि रतन राजपूतचे स्वयंवर झाले आहे, जे प्रेक्षकांनी खुप पसंत केले होते.

अर्शीने मुंबईत खरेदी केले घर
स्पॉटबॉयशी बोलताना अर्शीने खुलासा केला होता की, इतरांप्रमाणेच तिचे सुद्धा मुंबईत घर घेण्याचे स्वप्न होते, जे ती पूर्ण करू शकली आहे. मी नेहमी स्वप्न पहायचे की, स्वप्नातील शहरात माझे स्वत:चे घर असावे आणि मला विश्वासच बसत नाही की हे स्वप्न खरे झाले आहे. आता माझ्याकडे घर आहे याचा मला अभिमान वाटतो.

 

हे देखील वाचा

 

Maharashtra Crime News | पोलीस वसाहतीमध्ये गृहरक्षक तरुणीने घेतले जाळून

7th Pay Commission Update | केंद्रीय कर्मचार्‍यांसाठी खुशखबर ! अकाऊंटमध्ये क्रेडिट होतील 2 लाख रुपये,
18 महिन्याच्या DA एरियर बाबत मोठे अपडेट

CP Amitabh Gupta | आज रात्रीपासून संचारबंदीची अंमलबजावणी, पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांची माहिती (व्हिडिओ)

Zero Rupee Note In India | झीरो रुपयाची नोट छापण्याची भारतात का भासली होती गरज? जाणून घ्या कारण