CP Amitabh Gupta | आज रात्रीपासून संचारबंदीची अंमलबजावणी, पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांची माहिती (व्हिडिओ)

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात कोरोनाचे रुग्ण (Coronavirus in Maharashtra) वाढत असल्याने राज्य सरकारकडून कडक निर्बंध लागू केले आहेत. राज्यात रात्री 11 ते पहाटे 5 या वेळे संचारबंदी लागू केली असून याची अंमलबजावणी करण्याचे आदेशे राज्यातील पोलिसांना दिले आहे. या पार्श्वभूमीवर पुणे शहरात (Corona in Pune) देखील आज (सोमवार) रात्रीपासून संचारबंदीची (Curfew) अंमलबजावणी सुरु केली जाणार आहे. नागरिकांनी नियमांचे (Rules) पालन करुन पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन पुणे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता (CP Amitabh Gupta) यांनी केले आहे. तसेच कारवाई करण्याची वेळ पोलिसांवर आणू नये असे देखील पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता (CP Amitabh Gupta) यांनी म्हटले आहे.

 

 

शहरात (Pune City) कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने रात्रीची संचारबंदी लागू करण्यात आली आहे. यासंदर्भात बोलताना पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता (CP Amitabh Gupta) म्हणाले, राज्य सरकारच्या नियमावलीची अंमलबजावणी पोलीस दलाकडून करण्यात येत आहे. पुणे शहरामध्ये रात्री पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे. केवळ अत्यावश्यक सेवेतील लोकांना सवलत देण्यात आली आहे. तसेच बाहेर गावाहून रेल्वे, बस, विमानाने येणाऱ्या व जाणाऱ्यांनी आपल्यासोबत प्रवासाचे तिकीट (Travel Ticket) बाळगावे. हॉटेल (Hotel), रेस्टॉरंट (Restaurant) यांना रात्री 10 वाजेपर्यंत उघडे ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. त्यानंतर सर्व आवराआवर करुन त्यांना घरी जाण्यासाठी एक तासाचा अवधी देण्यात आला असल्याची माहिती गुप्ता यांनी दिली.

 

 

पुणे पोलीस दलातील 260 जणांना कोरोनाची लागण
पुणे शहर पोलीस दलात देखील कोरोनाने शिरकाव केला आहे. पुणे पोलीस दलातील 260 जणांना कोरोनाची लागण (Police Corona Infection) झाली आहे. यामध्ये पोलीस अधीकारी आणि कर्मचारी यांचा समावेश आहे. यातील 2 जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर इतरांवर घरीच विलगीकरणात (Home Quarantine) ठेवण्यात आले आहे. त्यांना आवश्यक ते सर्व सहकार्य व मदत पोलीस कल्याण विभागाकडून (Police Welfare Department) केली जात आहे. तसेच सर्व पोलीस ठाण्यांना कोरोना संसर्ग रोखण्याबाबत योग्य त्या सूचना दिल्या असल्याची माहिती पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी दिली.

 

Web Title :- CP Amitabh Gupta | Implementation of curfew from tonight, informed Pune Commissioner of Police Amitabh Gupta

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Coronavirus in Maharashtra | राज्यात नव्या ‘कोरोना’ रुग्ण संख्येत किंचित घट ! गेल्या 24 तासात 33 हजारांपेक्षाही जास्त नवे रुग्ण, जाणून घ्या इतर आकडेवारी

 

Pune Crime | पुण्यात गर्दीच्या ठिकाणी मोबाईल चोरणारी टोळी गुन्हे शाखेकडून गजाआड; मोबाईल जप्त

Rajesh Tope | कोरोनाची तिसरी लाट सुरू, पिकवर कधी असेल? राजेश टोपे म्हणाले…