Bigg Boss 16 च्या घरात पहिल्याच दिवशी ‘बिकिनी गर्ल’ने घातला राडा

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – नुकतंच ‘बिग बॉसच्या 16 व्या (Bigg Boss 16) पर्वाची सुरुवात झाली आहे. या स्पर्धेत भाग घेणाऱ्या सेलिब्रेटी स्पर्धकांची नावे आता समोर आली आहेत. प्रत्येक स्पर्धक बिग बॉसच्या घरात प्रवेश करतो तेव्हा तो विजेता होण्यासाठी काहीतरी विचार करूनच येतो. यामध्ये 16 स्पर्धकांनी घरात एन्ट्री केली आहे. यावेळी एन्ट्री करताच बिग बॉसच्या (Bigg Boss 16) घरात राडा दिसून आला. घरात असलेल्या बेडवरुन दोन स्पर्धकांमध्ये चांगलीच तुतू-मैमै झाली. पहिल्याच दिवशीच हा राडा झाल्याने हा शो नक्कीच रंगतदार होणार आहे.

 

 

काय घडले नेमके?
शनिवारी रात्री बिग बॉसच्या (Bigg Boss 16) सोळाव्या सीजनला सुरुवात झाली. सलमान खान (Salman Khan) हा शो होस्ट (Show Host) करत आहे. त्याने यावेळी आपल्या खास अंदाजात घरातील स्पर्धकांची ओळख करुन दिली. यंदाच्या बिग बॉसच्या घरात उत्तर प्रदेशची (Utter Pradesh) काँग्रेस (Congress) नेता आणि ‘बिकिनी गर्ल’ (Bikini Girl) म्हणून प्रसिद्ध असलेल्या अर्चना गौतमने (Archana Gautam) एंट्री केली आहे. सलमानने ओळख करुन दिल्यानंतर अर्चनाने फार मजेशीर रित्या स्वतःला सादर केलं आहे. अर्चनाने आपल्याला घरात खरं प्रेम मिळेल अशी अपेक्षा पहिल्याच दिवशी व्यक्त केली आहे.

यादरम्यान अर्चना गौतम आणि ‘छोटी सरदारनी’ फेम अभिनेत्री निमरीत कौर अहलुवालिया (Nimrit Kaur Ahluwalia) यांच्यात जोरदार राडा झाला.
बिग बॉसने निमरीतला घरात येणाऱ्या प्रत्येक सदस्याला कामाचं वाटप करुन त्यांना त्यांचा बेड सुनिश्चित करुन देण्याचं काम दिलं होतं.
जे ती काही प्रमाणात यशस्वीरित्या पार पाडत होती. यावेळी घरातील सदस्यांमध्ये बेडबाबत संवाद सुरु असताना निमरीत म्हणते,
गरज पडली तर मी अर्चना यांचा बेड बदलून इतरांना देऊ शकते, आणि त्यांना दुसऱ्या ठिकाणी शिफ्ट करु शकते.
हे ऐकून अर्चना भडकते. आणि कोणत्याही परिस्थिती आपण आपला बेड सोडणार नसल्याचं सांगते आणि त्यानंतर या वादाला सुरुवात होते.

 

Web Title :- Bigg Boss 16 bigg boss 16 archna gautam and nimrit kaur fight in first episode

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pune Crime | चक्क पोलीस चौकीसमोरच मायलेकीची टोळभैरव बापलेकाकडून छेडछाड

Shivsena | शिवसेनेवर दावा सांगण्याचा उद्दामपणा शिंदेंचा नाही…हे भाजपचं कारस्थान; शिवसेनेने ‘रोखठोक’ सुनावले

Shanikrupa Heartcare Centre | विना शस्त्रक्रिया करता हृदयरोगावरील उपचारांसाठी भारतातील उत्कृष्ट प्रिव्हेंटिव्ह कार्डिओलॉजी सेंटर शनिकृपा हार्टकेअर सेंटर