Pune Crime |  बेकायदा सावकारी करणाऱ्या 6 जणांवर FIR, एकाला अटक; सावकाराच्या घरातून कोटीचं घबाड जप्त

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime |  व्याजाने (Interest) दिलेल्या 7 लाखा रुपयांच्या व्याजाच्या मोबदल्यात जबरदस्तीने 18 गुंठे जगा नावावर करुन घेतल्याचा धक्कादायक प्रकार पुण्यात (Pune Crime) उघडकीस आला आहे. आरोपींनी फिर्यादी यांचे अपहरण (Kidnapping) करुन त्यांच्या घरच्यांना जीवे मारण्याची धमकी (Threat) देऊन जागा नावावर करुन घेतली. याप्रकरणी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात (Loni Kalbhor Police Station) 6 जणांवर गुन्हा (FIR) दाखल करुन एकाला अटक (Arrest) केली आहे.

 

स्वप्नील कांचन (Swapnil Kanchan), राजाराम कांचन Rajaram Kanchan (रा. उरळी कांचन), प्रशांत गोते Prashant Gote (रा. भिवरी ता. हवेली) यांच्यासह इतर तिघांवर महाराष्ट्र सावकारी अधिनियम (Maharashtra Lenders Act) व भादवी कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी स्वप्नील कांचन याला अटक केली असून त्याच्या घरातून एक कोटीचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी विकास रामदास कटके Vikas Ramdas Katke (वय-30 रा. आष्टापुर माळवाडी, ता. हवेली) यांनी फिर्याद दिली आहे. (Pune Crime)

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांनी स्वप्नील कांचन याच्याकडून 7 लाख रुपये व्याजाने घेतले होते. त्याबदल्यात त्यांनी 4 लाख 60 हजार रुपये दिले होते. त्यानंतरही आरोपीने फिर्यादी यांचे कारमधून अपहरण केले. तसेच लोणी काळभोर येथील सब रजिस्टार कार्यालयात नेले. त्याठिकाणी त्यांना व कुटुंबाला जीवे मारण्याची धमकी देऊन जबरदस्तीने व्याजाच्या पैशांपोटी 18 गुंठे जमीन प्रशांत गोते याच्या नावावर करुन घेतली. तसेच फिर्यादी यांना आत्महत्येस (Suicide) प्रवृत्त केले. 18 गुंठे जागा नावावर करुन घेतल्यानंतर देखील आरोपीने व्याजाचे पैसे आहेत, असे सांगत त्यांना धमकावत त्यांची वडिलोपार्जित जमीन नावावर करुन देण्यासाठी त्यांना व कुटुंबाला धमकी दिली.

दरम्यान, फिर्यादीनंतर लोणी काळभोर पोलिसांनी तीन पथके करुन आरोपीचे कार्यालय आणि घराची झडती घेतली.
आरोपी स्वप्नील कांचन याच्या राहत्या घरातून 57 लाख 38 हजार 540 रोख, तर 48 लाख 62 हजार 500 रुपये किमतीचे
सोन्याचे दागिने असा एकूण 1 कोटी 6 लाखांची बेहिशेबी मालमत्ता तसेच इतर महत्त्वाचे दस्तऐवज जप्त केला आहे.
आरोपी स्वप्नील कांचन याला अटक करुन न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने आरोपीला 1 फेब्रुवारी पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
आरोपीने इतर कोणाची अशा प्रकारे फसवणूक केली असेल तर त्यांनी लोणी काळभोर पोलिसांकडे संपर्क साधावा असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

 

ही कारवाई आयुक्त अमिताभ गुप्ता (CP Amitabh Gupta), पोलीस सह आयुक्त डॉ. रविंद्र शिसवे (Jt CP Joint Dr Ravindra Shisve),
अपर पोलीस आयुक्त पुर्व प्रादेशीक विभाग नामदेव चव्हाण (Addl CP Namdev Chavan),
पोलीस उपायुक्त परिमंडळ 5 नम्रता पाटील (DCP Namrata Patil), सहायक पोलीस आयुक्त बजरंग देसाई (ACP Bajrang Desai)
यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी (Senior Police Inspector Rajendra Mokashi)
व पोलीस ठाण्यातील इतर अधिकारी व अंमलदार यांनी केली आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अमित गोरे (PSI Amit Gore) करीत आहेत.

 

Web Title :- Pune Crime |  FIR against 6 illegal moneylenders, one arrested; Crores of rupees confiscated from moneylender’s house
 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

PM Kisan Samman Nidhi Yojana | ‘या’ सरकारी योजनेचा लाभ पती आणि पत्नी दोघे घेऊ शकतात का? हा आहे नियम

 

Pune Crime |  ‘भाई’ म्हणाला नाही म्हणून तरुणाला बेदम मारहाण, त्या ‘भाई’च्या मित्रांची वाकड पोलिसांनी मुंडण करुन काढली ‘धिंड’ (व्हिडीओ)

 

Pune Crime | सोशल मीडियावर अश्लील शब्द असलेले व्हिडीओ व्हायरल, स्वयंघोषीत ‘Thergaon QueenN’ ला अटक (व्हिडिओ)