PM Kisan Samman Nidhi Yojana | ‘या’ सरकारी योजनेचा लाभ पती आणि पत्नी दोघे घेऊ शकतात का? हा आहे नियम

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – PM Kisan Samman Nidhi Yojana | केंद्र सरकार (Central Government) शेतकर्‍यांच्या मदतीसाठी अनेक योजना राबवते. या योजनांच्या माध्यमातून सरकार शेतकर्‍यांना आर्थिक मदत (Financial Help) करते. त्यापैकी एक योजना म्हणजे प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना. या योजनेंतर्गत शेतकर्‍यांना शासनाकडून दरवर्षी 6 हजार रुपयांची आर्थिक मदत (Financial Help for Farmers) दिली जाते. सरकार हे पैसे प्रत्येकी 2,000 रुपयांच्या तीन हप्त्यांमध्ये देते. दर तीन महिन्यांनी सरकारकडून शेतकर्‍यांच्या खात्यात 2 हजारांची आर्थिक मदत दिली जाते. (PM Kisan Samman Nidhi Yojana)

 

आतापर्यंत केंद्र सरकारने या योजनेचे 10 हप्ते (10th Installment of PM Kisan Samman Nidhi Scheme) शेतकर्‍यांच्या खात्यात ट्रान्सफर केले आहेत. एप्रिल महिन्यापर्यंत 11 वा हप्ता येणे अपेक्षित आहे. या योजनेद्वारे, सरकार केवळ 2 हेक्टरपर्यंत लागवडीयोग्य जमीन असलेल्या लहान आणि सीमांत शेतकर्‍यांना आर्थिक मदत देण्याचा प्रयत्न करते.

 

या योजनेद्वारे गरीब शेतकर्‍यांना (Poor Farmers) आर्थिक मदत केली जाते. मात्र या योजनेबाबत सर्वसामान्यांमध्ये अनेक प्रश्न कायम आहेत. त्यापैकी एक प्रश्न असा आहे की पती-पत्नी दोघांनाही या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा (PM Kisan Samman Nidhi Yojana) लाभ स्वतंत्रपणे मिळू शकतो का? या प्रश्नाचे उत्तर जाणून घेवूयात –

पती-पत्नी दोघेही घेऊ शकत नाहीत योजनेचा लाभ
पती-पत्नी आणि त्यांच्या अल्पवयीन मुलांना पीएम किसान सन्मान निधी योजनेचा लाभ मिळतो. म्हणजेच सरकारची ही योजना शेतकरी कुटुंबासाठी आहे. अशा स्थितीत पती-पत्नी दोघांनाही स्वतंत्रपणे या योजनेचा लाभ मिळू शकत नाही. जर दोघांनी यासाठी अर्ज केला असेल आणि दोघांनाही या योजनेसाठी पैसे मिळत असतील, तर नंतर एखाद्याला त्याचे पैसे परत करावे लागतील.

 

यासोबतच प्राप्तीकर (Income Tax) भरणारे शेतकरी आणि 10 हजार रुपयांपेक्षा जास्त पेन्शन (Pensioners)
घेणारे कर्मचारीही या योजनेचा लाभ घेऊ शकत नाहीत.
तसेच शेती करणारे खासदार आणि आमदारांनाही या योजनेचा लाभ मिळत नाही.

 

योजनेसाठी असा करा अर्ज
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेत अर्ज करण्यासाठी, तुम्हाला अधिकृत वेबसाइट https://pmkisan.gov.in/ वर लॉग इन करावे लागेल.
यानंतर, सर्व माहिती आधार कार्ड (Aadhaar Card), बँक पासबुक (Bank Passbook), सातबारा आणि घोषणापत्राची पीडीएफ कॉपी (PDF Copy)
देखील अपलोड करावी लागेल. यानंतर तुमचा अर्ज पूर्ण होईल.

 

Web Title :- PM Kisan Samman Nidhi | pm kisan samman nidhi scheme 2022 know about the rules whether husband and wife both can be benificary of pm kisan samman nidhi

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Pune Crime |  ‘भाई’ म्हणाला नाही म्हणून तरुणाला बेदम मारहाण, त्या ‘भाई’च्या मित्रांची वाकड पोलिसांनी मुंडण करुन काढली ‘धिंड’ (व्हिडीओ)

 

Pune Crime | सोशल मीडियावर अश्लील शब्द असलेले व्हिडीओ व्हायरल, स्वयंघोषीत ‘Thergaon QueenN’ ला अटक (व्हिडिओ)

 

Weight Loss – Protein Intake | वजन कमी करण्याच्या नादात तुम्ही केवळ प्रोटीन डाएट तर घेत नाही ना? व्हा सावध, वाढू शकतो ‘हार्ट अटॅक’चा धोका