‘या’ ठिकाणी सरकारी शाळेतून मोठ्या प्रमाणात दारूची तस्करी, मुख्याध्यापकांसह 3 जणांना अटक

नवी दिल्लीः वृत्तसंस्था – बिहारच्या पूर्व चंपारणमधील सरकारी शाळेतून दारूचा मोठा माल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणाशी संबंधित पोलिसांनी 3 जणांना अटक केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, तेतरिया पोलिस स्टेशन परिसरातील काशीपकडी मध्यम विद्यालयावर पोलिसांनी छापा टाकला आणि तेथे लपवून ठेवलेल्या विदेशी दारूच्या 169 कार्टन जप्त केल्या. या प्रकरणात शाळेचे मुख्याध्यापक शिवशंकर प्रसाद, शिक्षक पती राजेंद्र रजक, रा. काशीपकडी गाव, यांना अटक करण्यात आली आहे.

पकड़ीदयाळ डीएसपी सुनील कुमार सिंह यांचे म्हणणे आहे की, दारूच्या धंद्यात अटक झालेल्या शिक्षकांचा सहभाग असल्याचे आढळले आहे. मोतीपूरच्या दोन दारू माफियांची नावेही समोर आली आहेत. काही स्थानिक व्यापारी आहेत. त्याचबरोबर इतरांच्या अटकेसाठी छापेमारी सुरू आहे. शाळेची किल्ली मुख्याध्यापकांकडे होती. घेघवा येथून एचएमला बोलावले असता कुलूप उघडल्यानंतर शाळेच्या खोलीतून दारू जप्त केली गेली. चौकशी दरम्यान शिक्षकांनी अनेक जणांची नावे दिली आहेत. अटक केलेले एचएम शिवशंकर प्रसाद आणि राजेंद्र रजक यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.

पोलिसांनी सांगितले की, शाळेची खोली दारू लपविण्यासाठी वापरली जात होती. हा व्यवसाय अनेक महिन्यांपासून चालू होता. रात्री दुचाकीस्वार शाळेजवळील खोलीतून दारूची बाटल्या घेऊन निघून जात असे. चार डिलिवरी मुले या व्यवसायात सामिल आहेत. संशय आल्यामुळे गावातील लोकांनी पोलिसांना याची माहिती दिली. येथे डीईओ अवधेश कुमार सिंह यांनी सांगितले की, मुख्याध्यापकावर कारवाई केली जाईल.