कापड व्यापाऱ्याची पत्नी, मुलगी आणि स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या

पटना : वृत्तसंस्था – बिहारमधील पटना येथे एक हृदयद्रावक घटना घडली आहे. पटनामधील किदवईपुरी येथे एका कापड व्यापाऱ्याने आपल्या पत्नी आणि मुलीवर गोळ्या झाडत स्वतःवर देखील गोळी झाडून आत्महत्या केली. या घटनेत वाचलेल्या लहान मुलाला गंभीर अवस्थेत दवाखान्यात दाखल करण्यात आले आहे. घटनास्थळावर दाखल होत पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतले आहेत. घरगुती वादातून हि आत्महत्या केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.

आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव निशांत सर्राफ असून तो पटनामधील मोठा कापड व्यापारी होता. पटनामधील खेतान मार्केटमध्ये त्याचे कपड्याचे मोठे दुकान होते. पाटणातील पॉश भाग किदवईपुरी येथे त्याचे घर होते. अंतर्गत कौटुंबिक कलहाच्या दिशेने सध्या पोलीस आपला तपास करत आहेत. निशांत सर्राफ आपली पत्नी अलका सर्राफ (३५)आणि दोन मुलं अनन्या (९) व इशांत (४) यांच्याबरोबर राहत होते. सोमवारी रात्री ही घटना घडल्यानंतर सकाळी उशिरापर्यंत त्यांच्या रूममधून कुणीही बाहेर न आल्याने घरच्यांना शंका आली. त्यांनी दुसऱ्या चावीने दरवाजा उघडला असता त्यांना बेडवर तिघे जण मृतावस्थेत आढळले. तर लहान मुलगा इशांत जखमी अवस्थेत होता. त्याला तात्काळ दवाखान्यात उपचारासाठी दाखल करण्यात आले.

दरम्यान, निशांत सर्राफ मोठे कापड व्यापारी असल्याने त्यांना व्यवसायात काही नुकसान झाले होते का? किंवा त्यांचे कुणाबरोबर यामुळे वाद झाले होते का? या दिशेने देखील पोलिस तपास करत आहेत.

आरोग्य विषयक वृत्त –

शरीर आतून शुद्ध नसेल तर येतो सतत थकवा, ‘हे’ आहेत संकेतडॉ. पायलच्या मृत्यूनंतर प्रशासनाला जाग, अ‍ॅन्टी रॅगिंग कमिटी सक्षम होणार

सर्व वयोगटासाठी दूध आवश्यक, होतील ‘हे’ फायदे

तोंडाची स्वच्छता न राखल्यास वाढतो हार्ट अटॅकचा धोका

Loading...
You might also like