केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांना मोठा धक्‍का ; पक्षात फूट, फुटीरनेते ‘नवा’ पक्ष काढणार

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – लोकसभा निवडणूकीत एनडीएत सहभागी झालेला रामविलास पासवान यांच्या लोक जनशक्ती पक्षात फुट पडली आहे. लोक जनशक्ती पक्षाचे नेते राष्ट्रीय महासचिव सत्यानंद शर्मा हे पक्षातून बाहेर पडून आपला नवा पक्ष स्थापन करणार असल्याची घोषणा केली आहे.

सत्यानंद शर्मा काढणार सेक्युलर पक्ष –
सत्यानंद शर्मा यांना याबाबत घोषणा करत त्यांनी सांगितले की त्यांच्या सोबत इतर 100 राष्ट्रीय कार्यकारिणीचे सद्स्यांनी पक्ष सोडण्याचा निर्णय दिला आहे. त्यांनी सांगितले की ते लवकरच नवा पक्ष काढणार असून त्याचे नाव लोक जनशक्ती पक्ष (सेक्युलर) असणार आहे.

पासवान यांच्यावर परिवारवादाचा आरोप –
सत्यानंद शर्मा यांच्याबरोबरच पक्षाचे आणखी एक नेता रमेश चंद्र कपूर यांनी रामविलास पासवान यांच्यावर परिवारवादाचा आरोप लावला असून रामविलास परिवाराच्या हितासाठी पक्षातील काम करणाऱ्या मेहनती लोकांना महत्व देत नाही.

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणूकीत बिहारमध्ये एनडीएला 40 पैकी 39 जागावर विजय मिळवता आला त्यात रामविलास पासवान यांच्या लोक जनशक्ती पक्षाचा 6 जागांवर विजय मिळाला आहे. असे असले तरी त्यांनी यंदाची निवडणूक लढली नव्हती.

आरोग्य विषयक वृत्त-
‘हे’ शक्य आहे, योग्स आहाराने वाढते हिमोग्लोबिनचे प्रमाण
शुद्ध रक्तपुरवठ्यासाठी (NAT)आधुनिक रक्ततपासणी आवश्यक
किचनमधील ‘या’ ९ भाज्यांचा ‘व्हायग्रा’सारखाच परिणाम