पुण्यातील बाईक जाळण्याचे लोण पोहचले ठाण्यात

ठाणे : पोलीसनामा ऑनलाइन – गेल्या काही वर्षापासून आपले वैर काढण्यासाठी रस्त्यावर पार्क केलेल्या दुचाकी वाहनांना आगी लावण्याचे प्रकार पुण्यात वारंवार घडत आले आहेत. पुण्यातील हे लोण आता ठाण्यात पोहचले आहे. ठाण्यात ९ दुचाकींना आगी लावून दिल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

ठाणे पश्चिम येथील कौशल्या हॉस्पिटलच्या जवळ रस्त्यावर पार्क केलेल्या दुचाकी गाड्यांना पहाटे साडेतीन वाजता आग लागली असल्याचे आढळून आले. तातडीने जवळच असलेल्या पाचपाखडी फायर सेंटरमधून गाडी घटनास्थळी पोहचली. पण तो पर्यंत सर्वच गाड्यांनी पेट घेतला होता. आग्निशामक दलाच्या जवानांनी ही आग तातडीने विझविली. त्यामुळे शेजारील अन्य वाहने आगीपासून बचावली.

या आगीत सुरेखा अहिरे, अमित खापरे, चंद्रकांत जाधव, संतोष भोईर यांच्या वाहनांसह  एकूण ९ वाहने जळून खाक झाली. ही आग कोणीतरी जाणीवपूर्वक लावल्याचा पोलिसांचा अंदाज आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

You might also like