Video : जेव्हा जगातील सर्वात ‘श्रींमत’ व्यक्ती बिल गेट्स धावपळ करत ‘वेटर’ची भूमीका बजावतात !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – जगातील सर्वात श्रीमंत माणूस जर एखाद्या हॉटेलमध्ये वेटरचे काम करत असल्याचे पाहून तुम्हाला नक्कीच धक्का बसेल. मात्र असे घडले आहे. जगातील सर्वात श्रींमत आणि मायक्रोसॉफ्टचे संस्थापक बिल गेट्स आणि बर्कशायर हाथवेचे चेअरमन वॉरेन बफे हे दोघे एका रेस्टॉरंटमध्ये वेटरचे काम करताना दिसले. तसेच या दोघांनी रेस्टॉरंटमध्ये आलेल्या ग्राहकांच्या ऑर्डर घेऊन त्यांना जेवण पोहचवण्याचे काम करताना दिसून आले.

६३ वर्षीय बिल गेट्स यांनी स्वत: ट्विटरवर व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत ते वेटरचे काम करताना दिसत आहेत. हा व्हिडीओ काही तासातच लाखो लोकांनी बघून त्यावर आपल्या प्रतिक्रीया दिल्या आहेत. व्हिडीओमध्ये त्यांच्यासोबत ८८ वर्षीय वॉरेन बफे हे देखील वेटरचा ड्रेस घालून काम करताना दिसत आहेत.
बिल गेट्स आणि वॉरेन बफे हे सध्या एकत्र वेळ घालवत आहेत. हे दोघे डेरी क्वीन या आईस्क्रीम आणि फास्ट फूडच्या रेस्टॉरंटमध्ये काम करताना दिसत आहेत.

या दोघांनी रेस्टॉरंटचे कॅश काउंटर सांभाळ्यापासून ग्राहकांना सेवा देण्यापर्य़ंतचे काम केले आहे. या व्हिडीओमध्ये दोघे रेस्टॉरंटमध्ये येताना दिसत आहेत. यानंतर या दोघांनी रेस्टॉरंटमधील कर्मचाऱ्यांप्रमाणे ड्रेस परिधान करून मिल्क शेक तयार करत असल्याचे व्हिडीओत दिसत आहेत.

या दोघांना अशा प्रकारचे काम करताना पाहून ग्राहकांना आश्चर्याचा धक्का बसला. ज्या ठिकाणी या दोघांनी काम केले ते डेरी क्वीर रेस्टॉरंट वॉरेन बफे यांचे आहे. वॉरेन बफे जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तीच्या यादीत चौथ्या क्रमांकावर आहेत. तर बिल गेट्स दुस-या क्रमांकावर आहेत.