सिग्नल तोडला म्हणून अडविले, तिने घेतला वाहतूक पोलीसालाच चावा 

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन

सिग्नल तोडून जात असताना अडविले म्हणून, मोपेडवरील एका महिलेने वाहतूक शाखेच्या महिला पोलीस कर्मचाऱ्याचाच  चावा घेतल्याची धक्कादायक घटना कॅम्प परिसरातील महावीर चौकात घडली. सदरची महिला धक्का देऊन फरार झाली आहे.

याबाबत महिला पोलीस हवालदार सुरेखा साबळे यांनी  दिलेल्या फिर्यादीवरून वानवडीत राहणाऱ्या एका  ३० वर्षाच्या माहिले विरूद्ध  लष्कर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
[amazon_link asins=’B07417987C’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’db9ed4a2-79de-11e8-9637-a758d6193d45′]

याबाबत सविस्तर वृत्त असे की, साबळे या सोमवारी सायंकाळी सहा वाजता कॅम्पमधील महावीर चौकात वाहतूक नियमन करीत होत्या. यावेळी मोपेडवरील महिलेने सिग्नल तोडल्याने त्यांनी तिला थांबविले त्यामुळे रागात तिने साबळे यांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली व धक्काबुक्की केली. हा प्रकार पाहून त्यांच्या मदतीला एक महिला पोलीस कर्मचारी तेथे आल्या व त्यांनी तिला थांबविण्याचा प्रयत्न केला. तेव्हा या महिलेने त्यांना चावा घेऊन आपली सुटका करुन घेऊन पळ काढला. आता लष्कर पोलिसांनी सदर  महिलेवर गुन्हा दाखल केला आहे.