Biporjoy Cyclone Update | बिपोरजॉय भारताच्या किनारपट्टीवर धडकण्याची शक्यता; ‘IMD’ चा इशारा

नवी दिल्ली : Biporjoy Cyclone Update | बिपोरजॉय चक्रीवादळ (Biporjoy Cyclone Update) तीव्र झाले आहे. बिपोरजॉयने तीव्र चक्रीवादळाच्या श्रेणीत प्रवेश केला आहे. चक्रीवादळाचा मार्ग बदलल्याने आता भारतालाही (India) धोका निर्माण झाला आहे. बिपोरजॉय चक्रीवादळ आपला मार्ग बदलल्यानंतर गुजरात (Gujrat) आणि पाकिस्तानच्या (Pakistan) किनारपट्टीवर धडकेल, असा अंदाज हवामान खात्याने (Indian Meteorological Department-IMD) वर्तवला आहे.

हवामान खात्याच्या (Indian Meteorological Department-IMD) अंदाजानुसार, बिपरजॉय चक्रीवादळ (Biporjoy Cyclone Update) कच्छच्या किनारपट्टीवर धडकण्याची शक्यता आहे. हे अधिक काळ टिकणारे चक्रीवादळ आहे. बिपरजॉय अलीकडच्या दशकात भारतावर प्रभाव टाकणारे आणि सर्वात दीर्घकाळ टिकणारे चक्रीवादळ ठरले आहे. अरबी समुद्रात (Arabian Sea) तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्याचे दहा दिवसानंतर दि. 6 जून रोजी चक्रीवादळात रुपांतर झाले आहे. हे चक्रीवादळ मोखा चक्रीवादळानंतर सर्वात शक्तिशाली चक्रीवादळ असल्याचे सांगण्यात येत आहे.

व्हिडिओ पहाण्यासाठी क्लिक करा

https://twitter.com/Indiametdept/status/1667985179367948291

बिपरजॉय चक्रीवादळ मुंबईच्या (Mumbai) समांतर पुढे सरकले आहे. बिपरजॉय चक्रीवादळ कच्छच्या किनारपट्टी धडकण्याची शक्यता असल्यामुळे या भागात धोक्याचा इशारा देण्यात आला. सौराष्ट्र आणि कच्छ किनारपट्टी भागात येलो अलर्ट (Yellow Alert) जारी केला आहे. मच्छीमारांना समुद्रात जाण्यास बंदी घालण्यात आली आहे. स्थानिक प्रशासन पूर्ण तयारीनिशी सज्ज झाले आहे. आवश्यक त्या उपाययोजना करण्याचे काम प्रशासनाकडून करण्यात येत आहे.

चक्रीवादळामुळे सौराष्ट्र आणि कच्छ किनारपट्टीसाठी धोक्याचा इशारा देण्यात आला आहे.
बिपरजॉय चक्रीवादळ पूर्व मध्य अरबी समुद्रावर 11 जून च्या 2330 IST वाजता अक्षांश 18.9N आणि लांब 67.7E
जवळ होते. चक्रीवादळ 15 जूनच्या दुपारपर्यंत मांडवी (गुजरात) आणि कराची (पाकिस्तान) दरम्यान
धडकण्याची शक्यता आहे.” अशी माहिती आयएमडीने (IMD) ट्विट करत दिली आहे.

राज्याच्या किनारपट्टी भागात वादळी वाऱ्यासह पाऊस –

वादळाच्या सावटाखाली राज्यात रविवारी मान्सून दाखल झाला. महाराष्ट्राच्या (Maharashtra) किनारपट्टीवर चक्रीवादळ धडकण्याचा धोका नाही, पण या चक्रीवादळाचा परिणाम दिसून येत आहे.
राज्याच्या किनारपट्टी भागात अनेक ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाने (Rain) हजेरी लावली.
कोकण आणि गोवा (Konkan and Goa) किनारपट्टी भागात वादळी वाऱ्यासह पाऊस झाला.
आज उत्तर कोकण (North Konkan) आणि मुंबई किनारपट्टी ( Mumbai Coast) लगत भागात वाऱ्यांचा वेग
अधिक असणार आहे. तसेच काही ठिकाणी पावसाची देखील शक्यता आहे.
बिपरजॉय चक्रीवादळाचा लँडफॉल 15 जूननंतर होण्याची शक्यता आहे.

Web Title :   Biporjoy Cyclone Update | Biporjoy likely to stretch nearly 10 days arabian sea cyclones are lasting longer biporjoy cyclone

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Gold Rate Today | आज पुण्यातील सोन्या-चांदीचा दर किती? जाणून घ्या

Jitendra Awhad on Chitra Wagh | DNA चाचणीवरुन जितेंद्र आव्हाडांचे चित्रा वाघ यांना प्रत्युत्तर, म्हणाले – ‘परत एकदा सांगतो…’

NCP Chief Sharad Pawar | शरद पवार धमकी प्रकरणी पुण्यातून आयटी इंजिनिअरला अटक