Jitendra Awhad on Chitra Wagh | DNA चाचणीवरुन जितेंद्र आव्हाडांचे चित्रा वाघ यांना प्रत्युत्तर, म्हणाले – ‘परत एकदा सांगतो…’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Jitendra Awhad on Chitra Wagh | राज्यात अचानक औरंग्याची पैदास वाढू लागली आहे. ती ज्यांनी जन्माला घातली आहे त्यांचा म्हणजे महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi) पैदावारांचा डीएनए (DNA) आणि औरंगजेबाचा (Aurangzeb) डीएनए एकच असावा, असं विधान भाजप (BJP) नेत्या चित्रा वाघ यांनी करत राष्ट्रवादीचे (NCP) नेते जितेंद्र आव्हाड यांच्यावर टीका केली होती. यावरुन जितेंद्र आव्हाड यांनी प्रत्युत्तर दिले आहे. (Jitendra Awhad on Chitra Wagh)

अहमदनगर मधील संदल उरुसच्या मिरवणुकीत काही तरुणांनी मुघल बादशहा औरंगजेबाचे पोस्टर झळकावत नाच केला होता. या घटनेवरुन राज्यातील वातावरण तापले असताना कोल्हापूरात (Kolhapur Violence) मोठा राडा झाला. या दोन घटनांवरुन राज्यातील सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर टीका करत आहेत. यातूनच, चित्रा वाघ यांनी संजय राऊत (Sanjay Raut) आणि जितेंद्र आव्हाड यांनी आपला डीएनए एकदा टेस्ट करून घ्यावा, असं ट्वीट केलं होतं. (Jitendra Awhad on Chitra Wagh)

काय म्हणाल्या चित्रा वाघ?

राज्यात अचानक औरंग्याची पैदास वाढू लागली आहे. ती ज्यांनी जन्माला घातली आहे त्यांचा म्हणजे महाविकास आघाडीच्या पैदावारांचा डीएनए आणि औरंगजेबाचा डीएन एकच असावा. अन्यथा काही तरूणांनी औरंगजेबाचं स्टेटस ठेवल्या प्रकरणी राज्यातील परिस्थिती संवेदनशील असताना महाविकास आघाडीच्या वाचाळवीरांकडून दंगे भडकवण्याचं काम झालं नसतं.

हे सगळं ठरवून केलं जातंय, यासाठी त्यांनी कट केला आहे. परंतु हे जनताही पाहत आहे. ‘ये पब्लिक है, ये सब जानती है’. महाविकास आघाडीचे नेते सर्वज्ञानी संजय राऊत आणि जितेंद्र आव्हाडांनी तर खरंच आपला डीएनए एकदा टेस्ट करून घ्यावा. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना विनंती आहे की, त्यांनी औरंग्याच्या औलादींचा बंदोबस्त करावा, ही निजामीवृत्ती आज ठेचली तरच कायमची अद्दल घडेल, असं चित्रा वाघ यांनी म्हटलं होतं.

जितेंद्र आव्हाडांचे चित्रा वाघ यांना प्रत्युत्तर

DNA हा शास्त्रीय शब्द आहे. स्त्री पुरुष संभोगातून जेव्हा मुलाला किंवा मुलीला जन्म दिला जातो तेव्हा त्या स्त्री आणि पुरुषांचे जणूके त्या बालकामध्ये आढळतात. नजीकचे उदाहरण म्हणजे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते (Senior Congress Leader) नारायण दत्त तिवारी (Narayan Dutt Tiwari) ह्यांच्यावर एका तरुणाने आरोप केला कि तेच माझे वडील आहेत. अर्थात त्याच्या आईची त्याला साथ होती. नारायण दत्त तिवारी यांनी ते नाकारलं पण कोर्टाने DNA टेस्ट करायला सांगितली आणि हे स्पष्ट झालं कि नारायण दत्त तिवारी हेच त्याचे वडील आहेत, असं आव्हाड म्हणाले.

आव्हाड पुढे म्हणाले, जेव्हा आपण जा तुझी DNA टेस्ट करून ये असं म्हणतो तेव्हा आपण त्या मुलाच्या आईच्या चारित्र्यावर संशय व्यक्त करत असतो. तेव्हा कोणाच्याही आईवर संशय व्यक्त करण्याचा अधिकार कोणीच कोणाला दिलेला नाही. मराठी साहित्यामध्ये आईच्या वेगवेगळ्या कविता आहेत. त्यामध्ये सगळ्यात मोठी मनाला भावणारी कविता आहे…’आई सारखे दैवत ह्या जगतामध्ये नाही’.

 

 

तुम्ही माझं DNA चेक करायला सांगता याचा अर्थ तुम्ही माझ्या आईच्या चारित्र्यावरच गेला होतात.
लोक मला म्हणतात तू असं का बोललास.
तर त्या लोकांनी समजून घ्यावं कि मी माझ्या मनाला चिमटा काढणारी गोष्ट सहन करीत नाही.
राजकारण गेलं खड्ड्यात. माझ्या फेसबुक तसेच ट्वीटर च्या प्रवासात गेल्या १० वर्षांत 2 स्त्रियांना मी उत्तरे दिली आहेत.
त्यामधील शेवटचे उत्तर ‘यांचा DNA तपासायला हवा’ हे बोलल्यानंतर दिले गेले आहे.
माझ्या आई वडिलांच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवणारे वाक्य प्रयोग करायचे हे ऐकून घेणाऱ्यातला मी माणूस नाही.
परत एकदा सांगतो राजकारण गेलं खड्ड्यात.
संबंधित व्यक्तीनीअनेक वेळा माझ्या वर हल्ले चढवले मी उत्तर दिले नाही कधीतरी
वेळ येते सांगायची मलाही लिहिता बोलता येते, असं जितेंद्र आव्हाड म्हणाले.

 

Web Title : Jitendra Awhad on Chitra Wagh | NCP leader Jitendra Awhad’s reply to
Chitra Wagh on DNA test, said – ‘Let me tell you again…’


Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update


हे देखील वाचा