NCP Chief Sharad Pawar | शरद पवार धमकी प्रकरणी पुण्यातून आयटी इंजिनिअरला अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – NCP Chief Sharad Pawar | राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आणि खासदार शरद पवार (NCP Chief Sharad Pawar) यांना सोशल मिडियावरून धमकी देणाऱ्या एका आरोपीला अटक (Arrested) करण्यात आली आहे. त्या आरोपीला मुंबई गुन्हे शाखेच्या (Mumbai Police Crime Branch) पथकाने पुण्यातून अटक केली. सागर बर्वे Sagar Barve (वय 34) असे शरद पवारांना धमकी देणाऱ्या आरोपीचे नाव आहे.

 

याबाबत माहिती अशी की, सागर बर्वे हा आयटी इंजिनिअर (IT Engineer) आहे. या आरोपीला पुण्यातून अटक करण्यात आली. अटक केल्यानंतर पोलिसांनी त्याला स्थानिक न्यायालयात हजर केले. त्यानंतर आरोपी बर्वेला स्थानिक न्यायालयाने पोलीस कोठडी (Police Custody) सुनावली आहे. अखेर शरद पवारांना (NCP Chief Sharad Pawar) धमकी देणाऱ्याला बेड्या ठोकण्यात मुंबई गुन्हे शाखेला यश आले. या प्रकरणात लोकमान्य टिळक मार्ग पोलीस ठाण्यात (Lokmanya Tilak Marg Police Station) मुंबई गुन्हे शाखेने गुन्हा दाखल केल्यानंतर पुढील तपास करत विविध पथके तयार करण्यात आली होती. त्यानंतर त्याला अटक केले आहे. दरम्यान, आरोपीची कसून चौकशी सुरू असून आरोपीने हे पाऊल का उचलले, याचाही शोध घेण्यात येत आहे.

 

पवार यांना जीवे मारण्याच्या धमक्या मिळाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) राज्यभर आक्रमक झाली होती. त्यानंतर राष्ट्रवादीच्या खासदार आणि शरद पवार यांच्या कन्या खासदार सुप्रिया सुळे (MP Supriya Sule) यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीच्या शिष्टमंडळाने मुंबई पोलीस आयुक्तांची (Mumbai Police Commissioner) भेट घेतली. शरद पवार यांना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या ट्विटर हँडलवर कारवाई करावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली. त्यानंतर मुंबई पोलिसांनी तातडीने दखल घेत तपास सुरू केला. अखेर आरोपीला अटक करण्यात गुन्हे शाखेला यश आले. आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी काही तांत्रिक बाबींचा आधार घेतला. आरोपी सागर बर्वे हा माहिती व तंत्रज्ञान क्षेत्रात कार्यरत असून त्याने दोन्ही खाती तयार केल्याचा पोलिसांना संशय आहे.

दरम्यान, राजकारण महाराष्ट्राचे या फेसबुक खात्यावर ‘नर्मदाबाई पटवर्धन’ या नावाने एक खाते आहे.
त्यावर असलेल्या पोस्टमध्ये पवार यांना उद्देशून ‘तुझा लवकरच दाभोलकर होणार’, अशी धमकी देण्यात आली होती.
तर सौरभ पिंपळकर (Saurabh Pimpalkar) नावाच्या ट्विटर हँडलवरुन शरद पवार यांच्याबाबत
आक्षेपार्ह भाषेचा वापर केलेला मजकूर प्रसिद्ध करण्यात आला होता.

 

Web Title :  NCP Chief Sharad Pawar | IT engineer arrested from Pune in case of Sharad Pawar death threat case

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा