Biporjoy Cyclone Updates | गुजरातनंतर आता ‘बिपरजॉय’ राजस्थानला धडकणार; अनेक जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीचा ‘रेड अलर्ट’

मुंबई/नवी दिल्ली : Biporjoy Cyclone Updates | बिपरजॉय चक्रीवादळ (Biporjoy Cyclone Updates) गुजरातला (Gujarat) धडकल्यानंतर आता हे वादळ राजस्थान (Rajasthan) आणि पाकिस्तानकडे (Pakistan) सरकले आहे. राजस्थानमध्ये मुसळधार पाऊस (Heavy Rain) पडत आहे. वादळामुळे मोठे नुकसान झाले आहे. बिपरजॉय चक्रीवादळाने गुजरातला जोरदार तडाखा दिला. आता राजस्थानला तडाखा बसणार आहे.

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Union Home Minister Amit Shah) आज गुजरातमधील वादळग्रस्त कच्छ भागाची पाहणी करणार आहेत. राजस्थान मधील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा रेड अलर्ट (Red Alert) जारी करण्यात आला आहे. बिपरजॉयमुळे (Biporjoy Cyclone Updates) राजस्थानच्या उदयपूरमध्ये तुफान पाऊस कोसळला आहे. अनेक इमारतींच्या काचा फुटल्या आहेत. तर गाड्यांचेही नुकसान झाले आहे. त्यामुळे लोकांनी या वादळाची धडकी घेतली आहे.

समुद्रात मोठ्या लाटा उसळत आहेत. त्यामुळे कोणीही समुद्रकिनारी जाऊ नये, असे आवाहन करण्यात आले आहे. अनेक जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडत आहे. याशिवाय एनडीआरएफ (NDRF) आणि एनडीआरएफच्या (SDRF) अनेक तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. राज्य आणि केंद्र सरकार (State and Central Government) परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे.

दरम्यान, बिपरजॉय चक्रीवादळाची तीव्रता कमी झाली असून गुरुवारी रात्री गुजरातला धडकलेल्या या चक्रीवादळामुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही, अशी माहिती राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाचे महासंचालक अतुल करवाल (Atul Karwal) यांनी शुक्रवारी दिली. चक्रीवादळाच्या प्रभावामुळे 23 जण जखमी झाले (23 people injured) असून, कच्छ-सौराष्ट्र प्रदेशाला या चक्रीवादळाचा जोरदार तडाखा बसल्याचे सांगण्यात आले. या भागातील हजाराहून अधिक गावे अंधारात गेली आहेत. विद्युत खांब कोसळल्याने येथील वीजपुरवठा पूर्ववत होण्यास वेळ लागणार आहे.

अरबी समुद्रातील (Arabian Sea) चक्रीवादळाने आलेल्या पावसाने कच्छ आणि गुजरातच्या सौराष्ट्र भागातील काही भागांना झोडपून काढले.
गुरुवारी सायंकाळी चक्रीवादळ जखाऊ बंदराजवळ धडकण्यास सुरुवात झाल्यानंतर संपूर्ण कच्छ जिल्ह्यात मुसळधार पाऊस झाला.
बिपरजॉय चक्रीवादळ आज पाकिस्तानातील सिंधला धडकणार आहे.
त्यामुळे वादळाचा धोका लक्षात घेऊन 66,000 नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे.
पाकिस्तानच्या हवामान ऊर्जा मंत्री शेरी रहमान यांनी लोकांना अधिकाऱ्यांना सर्तक राहण्याचे आवाहन केले आहे.
ते म्हणाले की, सर्व बचाव संस्था मदतकार्यासाठी सज्ज आहेत.

Web Title :  Biporjoy Cyclone Updates | cyclone biporjoy moved towards rajasthan and pakistan heavy rains in rajasthan

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

ACB Trap News | 2000 रुपये लाच घेताना येवला पंचायत समितीच्या शिक्षण विभागातील वरिष्ठ लिपीकाला एसीबीकडून अटक

Pune Gold Rate Today | आज पुण्यातील सोन्या-चांदीचे दर काय? जाणून घ्या

ACB Trap News | सावकारी लायसन्सच्या कामासाठी 50 हजार रुपये लाच मागणारा वेल्हे सहाय्यक निबंधक कार्यालयातील लिपीक एसीबीच्या जाळ्यात