Bird Flu आणि कोरोना पैकी कोण आहे जास्त धोकादायक, ही सावधगिरी बाळगली तर राहणार नाही टेन्शन

पोलीसनामा ऑनलाइन टीम – देशात कोरोना (Coronavirus) संसर्गानंतर बर्ड फ्लू (Bird Flu )पसरू लागला आहे. सुमारे दहा राज्यांमध्ये याची सक्रियता आढळली आहे. मात्र, अनेक राज्यांमध्ये सॅम्पलचा रिपोर्ट येणे बाकी आहे. कोरोनाचे संकट असतानाच बर्ड फ्लू आल्याने लोकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. मात्र, यास घाबरण्याचे कारण नाही. समान्यपणे लोकांच्या मनात हे प्रश्न येतात की दोन्ही पैकी जास्त धोकादायक कोण आहे, याचा उपचार आहे का ?

कोरोनापासून बचाव आणि उपचारासाठी आयटीबीपी द्वारे स्थापन करण्यात आलेल्या सर्वात मोठ्या सेंटरवर रूग्णांवर उपचार केलेले डॉ. राजकुमार यांनी सांगितले की, दोन्ही पैकी कुणीही धोकायदायक नाही, मात्र काही सावधगिरी बाळगली पाहिजे. बर्ड फ्लूमध्ये काही गोष्टींची काळजी घेतली तर टेंशन राहणार नाही. जरी दोन्ही आजारांची लक्षणे काहीशी मिळती-जुळती असली, तरी बर्ड फ्लूचा उपचार शक्य आहे. तो अगोदरही पसरलेला आहे.

कोरोना संसर्गापासून वाचण्याच्या पद्धतीप्रमाणे बर्ड फ्लूमध्ये सुद्धा मास्क लावा, हात आणि तोंड धुवत राहा आणि खाण्या-पिण्यामध्ये कच्च्या पदार्थांऐवजी उकडलेले पदार्थ खा. यामुळे बर्ड फ्लूपासून बचाव होऊ शकतो.

डॉ. राजकुमार यांच्यानुसार, बर्ड फ्लूमध्ये रूग्णाला श्वास घेण्याचा त्रास होतो. नाक वाहणे आणि उलटीसारखी लक्षणे सुद्धा दिसून येतात. काही रूग्णांच्या हाडांमध्ये वेदना आणि मांसपेशी दुखणे अशी लक्षणे आढळतात. डोकेदुखी सुद्धा याचे एक लक्षण आहे.

रहिवाशी परिसरात जर आजूबाजूला कोंबडी पालन केंद्र असेल तर येथील लोकांनी विशेष काळजी घेतली पाहिजे. त्या फार्ममध्ये बर्ड फ्लूमुळे पक्षांचा मृत्यू होत असेल तर काही दिवसांसाठी फार्म बंद ठेवावा. बर्ड फ्लू सुद्धा कोरोना व्हायरसप्रमाणे डोळे, नाक आणि तोंडावाटे शरीरात प्रवेश करतो. याच कारणामुळे बर्ड फ्लूमध्ये सुद्धा मास्क लावण्याचा सल्ला दिला जातो.

वेळीच उपचार केला नाही तर हा व्हायरस मनुष्यासाठी जीवघेणा ठरू शकतो. नॉन-व्हेज खाणार्‍यांनी जास्त सावधगिरी बाळगली पाहिजे. काही काळासाठी ते टाळणे चांगले ठरेल. जर हे शक्य नसेल तर ते योगप्रकारे शिजवावे. तयार करण्यापूर्वी ते उकळवून घ्या. यामुळे कीटाणु असल्याची शंका नष्ट होईल.

बर्ड फ्लू हा नवा आजार नाही. याचा प्रकोप अनेकदा दिसून आला आहे. वेळीच निदान झाले तर याच्यावर उपचार होऊ शकतो. याचा आउटब्रेक अगोदर झाला असल्याने याचे अँटीजन आणि म्यूटेशन बदलत राहते. यामुळे घाबरण्याची आवश्यकता नाही.

मध्यप्रदेश, हिमाचल प्रदेश, राजस्थान गुजरात, केरळ आणि हरियाणा इत्यादी राज्यात बर्ड फ्लू वेगाने पसरत आहे. येथे मोठ्या संख्येने कावळे आणि अन्य पक्षी मरून पडत असल्याने भितीचे वातावरण पसले आहे. राज्य सरकारांनी वेगाने सॅम्पल घेण्यास सुरूवात केली आहे. आरोग्य कर्मचारी, पशुपालन विभाग आणि वन्य प्राणी विभागाची पथके घटनास्थळांचा दौरा करत आहेत.