बर्थडे स्पेशल : अशोक पत्की, संगीतकार, गीतकार                                                         

पोलीसनामा ऑनलाईन

अशोक पत्की (जन्म : २५ ऑगस्ट, इ.स. १९४१) हे गीतकार आणि संगीत दिग्दर्शक आहेत. त्यांनी अनेक मराठी-हिंदी चित्रपटांना, जाहिरातींना व दूरदर्शन मालिकांना संगीत दिले आहे. आठ हजारांहून जास्त जिंगल्स, चारशे नाटकांचे संगीत, सव्वाशे चित्रपटांना संगीत, ५०० मालिकांची शीर्षकगीते त्यांच्या नावावर आहेत.‘नाविका रे वारा वाहे रे’ हे सुमन कल्याणपूर यांनी गायलेले गाणे हे अशोक पत्की यांनी अगदी पहिल्यांदा संगीतबद्ध केलेले गाणे होय.

अशोक पत्की मुंबईतल्या कांदेवाडीत रहात, नंतर खारला आणि शेवटी माहीमला गेले. संगीतकार म्हणून अशोक  पत्कींनी १९७२ साली आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली .अशोक पत्की लहानवयातच तबला आणि हार्मोनियम वाजवण्यात ते पारंगत झाले.सुधीर फडके यांचे त्यांना मार्गदर्शन व साथ लाभली. बालनाट्य ,अल्बम ,भक्तिगीतांसाठीही त्यांनी संगीत दिग्दर्शन केले .आम्ही असू लाडके , आलिशा, अंतर्नाद, आनंदाचे झाड, बिनधास्त, चिंगी, चिनू, दे टाळी, गोष्ट धमाल नाम्याची, प्रेम करू या खुल्लमखुल्ला अशा असंख्य चित्रपटांना त्यांनी संगीत दिले. ११५ मराठी चित्रपट, २५0 च्यावर नाटके, आणि ५ हजारांवर जिंगल्स त्यांच्या नावावर आहेत. आभाळमाया, गोट्या,  वादळवाट अशा टीव्ही मालिकांनाही त्यांनी संगीत दिले आहे. त्यांची जिंगल्स अतिशय लोकप्रिय झाली आहेत.  ‘मिले सूर मेरा तुम्हारा’ पीयूष पांडे यांची रचना असलेल्या गीताला खूपच  प्रसिद्धी मिळाली.
[amazon_link asins=’B01K4K6266,B07FDXCWRH’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’6207721e-a85d-11e8-8868-117685a0ec4c’]

अशोक पत्की यांना, संगीतक्षेत्रातील त्यांच्या योगदानासाठी अनेक पुरस्कारांनी सन्मानित केले गेले. प्रियतमा आणि चार दिवस प्रेमाचे साठी  नाट्यदर्पण पुरस्कार  त्यांना प्राप्त झाला.  त्यांनी संगीत दिलेल्या चित्रपटांसाठी अर्धांगी, आपली माणसं, सावली अशा काही चित्रपटांना महाराष्ट्र राज्याचा चित्रपट पुरस्कार प्राप्त झाला. नॅशनल फिल्मसाठी २००६ मध्ये अंतर्नाद, मराठी इंटरनॅशनल फिल्म ऍण्ड थिएटरअवॉर्ड , ‘मी सिंधूताई सपकाळ’साठी सूरसिंगार पुरस्कार, ‘गोष्ट धमाल नाम्याची’साठी व्ही. शांताराम पुरस्कार अशा पुरस्कारांनी ते सन्मानित झालेत मंगेशकर स्मृतिपुरस्कार , शब्दरत्न गौरव पुरस्कार,  राम कदम पुरस्कार, झी. टीव्ही पुरस्कार, सह्याद्रीचा नवरत्न पुरस्कार अशा पुरस्कारांचे पत्की मानकरी ठरलेले आहेत.

कंगना राणावत पुन्हा दिसणार बायोपीकमध्ये 

पुण्यात त्यांनी २०१३ मध्ये “संचारी गुरुकुल”  संगीतशाळा  काढली आहे. ‘सप्त सूर माझे’ हे त्यांचे आत्मचरित्र प्रकाशित झाले आहे.