Birthday SPL : बेडरूमध्ये अभिनेत्री परवीन बाबीला ‘तसल्या’ अवतारात पाहून महेश भटच्या अंगावार आला होता ‘काटा’ !

पोलीसनामा ऑनलाईन :बॉलिवूड अनेक प्रेमकहाणींचा साक्षीदार आहे. अशीच एक कहाणी आहे परवागनी बाबी या अभिनेत्रीची. परवीन बाबी हिचं नाव कबीर बेदी, डॅनी, महेश भट यांच्याशी जोडलं गेलं परंतु लग्न मात्र कोणाशीच झालं नाही. महेश भट आणि परवीन यांची लव स्टोरी खूप चर्चित आहे. महेश भट यांनी त्यांचे अनेक किस्से सांगितले आहेत. आज(दि 4 एप्रिल) परवानी बाबीचा वाढदिवस. महेश भटच्या मुलाखतीतील अंश.

जेव्हा परवीन बाबीचं करिअर जोरात सुरू होतं तेव्हा तिला महेश भटवर प्रेम झालं होतं. त्यावेळी ते फ्लॉप फिल्ममेकर होते. अशात परवीन मानसिक आजारानं ग्रस्त झली आणि तिला प्रत्येकजण दुश्मन वाटू लागला.

https://www.instagram.com/p/B-i6i99hvxT/

1977 साली परवीन महेशच्या प्रेमात होती. त्यावेळी महेश विवाहित होते. परवीन सुपरस्टार होती. महेशनं तेव्हा स्वत:ला इंडस्ट्रीत सिद्ध केलं नव्हतं. परवीन तेव्हा अमर अकबर, अँथोनी आणि काला पत्थरची शुटींग करत होती. महेशनं परवीन सोबत लिव्ह इनमध्ये राहण्यासाठी पत्नी लॉरेन आणि मुलगी पूजाला सोडलं होतं.

महेश भट सांगतात, “1979 साली एका सायंकाळी जेव्हा मी तिच्या जुहूच्या अपार्टमेंटमध्ये पोहोचलो आणि मी बेडरूमध्ये गेलो जिथं सर्व परफ्युम ड्रेसिंग टेबलवर होते. आजही त्याचा गंध माझ्या डोक्यात घुमतो. मी जे काही पाहिलं ते पाहून माझ्या अंगावर काटा आला. एक फिल्म कॉस्ट्युम करत परवीन बेड आणि भिंतीच्या मध्ये आखडून बसली होती. तिची पद्धत एखाद्या खुंखार जनावरासारखी होती. तिच्या हातात चाकू होता.”

https://www.instagram.com/p/B-g9M4Bh–z/

महेश सांगतात, “हे काय चाललंय विचारल्यावर परवीन म्हणाली, बोलू नकोस कोणीतरी आपली हेरगिरी करतंय. मला मारण्यासाठी तो झुंबर पाडेल. तिला काय झालंय याबद्दल बोललं जाऊ लागलं. एक अफवा तर अशीही होती की, तिचं यश पाहून कोणीतरी काळी जादू केली आहे.”

https://www.instagram.com/p/B0ToD5eBRvJ/

महेश सांगतात, “एकदा तर परवीन बिना कपड्यांचीच माझ्या मागे धावली होती. अनेक उपचार घेऊनही तिची प्रकृती सुधारली नाही. 20 जानेवारी 2005 रोजी परवीननं जगाचा निरोप घेतला.”

https://www.instagram.com/p/BtkyulfglZo/

महेश त्यांच्या यशाचं श्रेय परवीनला देतात. महेश यांचा अर्थ हा सिनेमा परवीन आणि त्यांच्यावर आधारीत आहे. महेश मानतात की, परवीननं त्यांच्या अस्तित्वाला खरंच अर्थ दिला आहे.

https://www.instagram.com/p/Bqi7jMTAqbZ/

https://www.instagram.com/p/BqEYS_xgDpH/

https://www.instagram.com/p/BqRNTMVAOTg/