Amazon भारतात लॉन्च करणार ‘इलेक्ट्रिक’ डिलिवरी ‘रिक्षा’, फाऊंडर जेफ बेजोसने केले ‘ट्विट’ (व्हिडिओ)

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – अ‍ॅमेझॉन भारतात लवकरच आपली इलेक्ट्रिक डिलिवरी रिक्षा आणणार आहे. अ‍ॅमेझॉनचे फाऊंडर जेफ बेजोस यांनी सोमवारी यासंबंधित ट्विट करत माहिती दिली. ते म्हणाले की, भारतात जीरो कार्बन उत्सर्जन करणाऱ्या ई – रिक्षा आणण्यात येतील. अ‍ॅमेझॉन 7 वर्षांपूर्वी भारतात आले. यावर कंपनी 5 बिलियन डॉलरपेक्षा जास्त पैसे लावणार आहे.

आपल्या ट्विटमध्ये जेफ बेजोस म्हणाले की, इंडिया, आम्ही इलेक्ट्रिक डिलिवरी रिक्षा भारतात आणत आहोत. ही पूर्णपणे इलेक्ट्रिक असेल आणि जीरो कार्बन उत्सर्जन करेल. यात बेजोस यांनी #ClimatePledge हा हॅशटॅग देखील वापरला आहे.बेजोस यांनी एक व्हिडिओ शेअर केला आहे, त्यात ते स्वत: ही रिक्षा चालवताना दिसत आहेत.

ही व्हिडिओ आता पर्यंत लाखभर यूजर्सने शेअर केला आहे. मागील आठवड्यात बेजोस भारतात आले होते. या दरम्यान त्यांनी अनेक फोटो, व्हिडिओ सोशल मिडियावर शेअर केले. रविवारी त्यांनी एक व्हिडिओ शेअर केला ज्यात ते कंपनीच्या डिलिवरी स्टेशनवर कर्मचाऱ्यांशी गप्पा मारत होते. बेजोस यांनी भारतीय ग्राहकांना एक पत्र लिहिले आहे, ज्यात बेजोस म्हणाले की भारतीयांची ऊर्जा आणि धैर्य त्यांना प्रेरित करते.

फेसबुक पेज लाईक करा – 

You might also like