Lockdown : बिन कामाचे जुने बँक अकाऊंट करा बंद, ‘ही’ एकदम सोपी प्रक्रिया, जाणून घ्या
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – जर तुम्ही एकापेक्षा जास्त बँक खाते उघडले असेल आणि जर ते तुमच्या काही कामाचे नसेल तर आपण ते खाते बंद करू शकता. कारण, जरी तुम्ही त्या खात्याचा वापर करत नसला तरी त्या खात्यामध्ये त्रैमासिक किमान रक्कम ठेवणे गरजेचे असते. म्हणून ही खाती बंद करणे योग्य ठरेल. बचत खात्यात जर किमान ठेव नसेल तर त्याचा दंड तुम्हाला भरावा लागू शकतो. याव्यतिरिक्त, तुमचा क्रेडिट स्कोअर देखील खराब होऊ शकतो. त्यामुळे ज्या खात्याचा तुम्हाला उपयोग नाही ते खाते तुम्ही बंद करु शकता. खाते बंद कसे करावे ते जाणून घेऊया….
सर्वप्रथम तुम्ही आपल्या अतिरिक्त खात्यास सगळे डेबिट कार्ड डी-लिंक करुन घ्या. जर तुम्ही ते खाते तुमच्या कर्जाच्या ईएमआयशी जोडले असेल तर खाते बंद करण्यापूर्वी तुम्ही तुमच्या कर्जदाराला दुसरे बँक खाते क्रमांक द्या. जर तुम्हाला मागचे वेतन खाते बंद करायचे असेल तर आपल्या एप्लॉयरला नवीन खात्याच्या डिटेल्सबद्दल माहिती सांगा. जरी आपली पेन्शन त्या खात्यावर येत असली तरीही आपण प्रथम आपल्या नियोक्तास नवीन खात्याच्या तपशीलासह अपडेट केले पाहिजे.
खाते बंद करण्यासाठी बँक शाखेत जा. शाखेत जाऊन क्लोजर फॉर्म आणि डी-लिंकिंग फॉर्म भरा. बँकेत जाताना बँकेकडून मिळालेले चेकबुक जर उरले असेल तर ते सोबत घेऊन जा, क्रेडिट कार्ड व डेबिट कार्ड सोबत घेऊन बँकेत जमा करा.
बँक खाते बंद करण्यासाठी काही फी भरावी लागेल, तथापि, आपण खाते उघडल्यानंतर 14 दिवसांच्या आत खाते बंद करत असाल तर कोणतीही फी भरावी लागणार नाही. जर आपण खाते उघडल्यानंतर एक वर्षानंतरही खाते बंद केले तर कोणतीही फी आकारली जाणार नाही. मात्र या दोन कालावधीच्या मध्ये जर खाते बंद केल्यास बँकांचे शुल्क वेगवेगळे असेल.