‘या’ मोठ्या कारणामुळं ‘लॉकडाऊन’नंतर तुम्हाला महाग ‘पेट्रोल-डिझेल’ खरेदी करावं लागू शकतं

नवी दिल्ली – कोरोना विषाणूमुळे लॉकडाउन आणि त्यामुळे आलेल्या आर्थिक संकटानंतर आता नागरिकांना जून महिन्यात आणखी एका संकटाचा सामना करावा लागणार आहे. मे महिन्यानंतर पेट्रोल आणि डिझेलच्या किरकोळ किमतींमध्ये दररोज बदल करू शकतील त्याचा फटका सामान्य नागरिकांच्या खिशाला बसू शकतो. लॉकडाउन संपल्यानंतर इंधनांचे दर रोज ठरवण्याची प्रक्रिया पुन्हा सुरू होऊ शकते त्यामुळे दररोज पेट्रोल, डिझेलच्या किमतींत वाढ होऊ शकते अशी माहिती तेल उत्पादक कंपन्यांमधील (OMC) सूत्रांनी दिली आहे.

सरकारी कंपनीतील अधिकाऱ्याने नाव गुप्त राखण्याच्या अटीवर असं सांगितलं की, 16 मार्चपासून पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींत काहीही बदल केलेला नाही. त्यामुळे सरकारला किरकोळ वस्तूंच्या किंमती न वाढवता पेट्रोल, डिझेलचं उत्पादन शुल्क वाढवावं लागेल. दररोज दर बदलायला सुरूवात झाल्यावर काही दिवस इंधन महागणार आहे. इंधनाचं उत्पादन आणि विक्री यामधील तफावत तेलकंपन्या जोपर्यंत भरून काढत नाहीत तोपर्यंत किरकोळ विक्रीच्या किमतीत जास्तीतजास्त 30 ते 50 पैशांनी इंधनाची किंमत वाढू किंवा कमी होऊ शकते. त्याहून अधिक वाढ किंवा घट सरकारला करता येणार नाही.