BJP-2024 Loksabha Plan | आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भाजपची तयारी सुरू; चार सदस्यांची समिती स्थापन

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – BJP-2024 Loksabha Plan | 2019 च्या लोकसभा निवडणुकीत ज्या ठिकाणी पक्षाची कमकुवत स्थिती होती. त्या ठिकाणी म्हणजे देशातील 100 मतदार संघावर पकड मजबूत करण्यावर भाजपने प्रयत्न सुरू केले आहेत. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीची तयारी आतापासून भाजपने (BJP-2024 Loksabha Plan) सुरू केली असल्याचे समोर आले आहे. महत्त्वाचे म्हणजे चार सदस्यांची समितीही स्थापन केली असल्याचे भाजपच्या एका वरिष्ठ नेत्याने सांगितले.

पक्षाची पकड मजबूत करण्यासाठी निवडक मतदार केंद्रांवर विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे. त्यासाठी वरिष्ठ नेत्यांचे दौरे आयोजित केले जाणार आहे. ज्या मतदार संघावर पकड सैल झाली आहे त्यामागील कारणे शोधण्यात येणार आहे. निवडणुकीपूर्वी त्या ठिकाणची पक्षाची स्थिती मजबूत करण्यात येईल. त्याशिवाय रिक्त पदांची जबाबदारी ही भक्कम कार्यकर्त्यांवर सोपवली जाईल. मतदार यादी पानप्रमुखांना मतदारांना पक्षाशी जोडण्यासाठी थेट संपर्कासाठी प्राधान्य देण्यात येईल, महत्त्वाचे म्हणजे यासाठी सोशल मीडियाचाही उपयोग करण्यात येणार असल्याचे भाजपच्या वरिष्ठ नेत्याने सांगितले. (BJP-2024 Loksabha Plan)

चार सदस्यांची समिती स्थापन –
देशात 100 लोकसभा मतदार संघातील 74 हजार मतदान केंद्र आहेत जिथे पक्षाची ताकद कमकुवत आहे. अशा ठिकाणी ताकद वाढवण्यासाठी चार सदस्यांची समिती नेमली आहे. त्याची जबाबदारी बी. जे. पांडा (B. J. Panda), दिलीप घोष (Dilip Ghosh), सरचिटणीस सी. टी. रवी (C. T. Ravi) आणि अनुसूचित जाती मोर्चाचे लाल सिंह आर्य (Lal Singh Arya) यांना देण्यात आली आहे. ज्या ठिकाणी पक्षाची ताकद कमी आहे त्या ठिकाणी अल्पसंख्यांक मतदारांची संख्या जास्त आहे. ही मतदान केंद्रे ज्या राज्यात भाजपची सत्ता नाही त्या ठिकाणची आहेत. त्यामुळे यावेळी भाजप पश्चिम बंगाल (West Bengal), आंध्र प्रदेश (Andhra Pradesh), केरळ (Kerala) आणि तमिळनाडू (Tamil Nadu) राज्यांवर सर्वात जास्त लक्ष केंद्रित करणार असल्याचे दिसत आहे.

Web Title : BJP-2024 Loksabha Plan | bjp plans 2024 loksabha elections it will focus on 100 seats

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

शारीरीक संबंधाचे व्हिडिओ व्हायरल करण्याची दिली धमकी;
घरी, वेगवेगळ्या हॉटेल रुममध्ये आणि कारमध्ये बोलावून लैंगिक अत्याचार

 

Navneet Ravi Rana Sent To Judicial Custody | राणा दाम्पत्याच्या अडचणीत मोठी वाढ !
कोर्टाने सुनावली 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी, जामीन अर्जावरील सुनावणीही लांबणीवर

 

 घरात घुसून 18 वर्षाच्या तरुणीचा विनयभंग, हडपसरच्या फुरसुंगी परिसरातील घटना

 

Pune Crime | इन्स्टाग्रामवर बनला मित्र, 20 वर्षाच्या तरुणीला कोल्ड्रींग मधून गुंगीचे औषध देऊन दाखवलं ‘काम’,
बलात्कार प्रकरणी FI