मिरजमध्ये भाजप, राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा तुफान राडा, ८ जखमी

मिरज : पोलीसनामा ऑनलाईन

राज्यात गणरायाचे उत्साहात स्वागत होत असताना मात्र मिरजमध्ये गणेश मिरवणूकीत भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये तुफान हाणामारी झाली. यामुळे गणेश मिरवणूकीला गालबोट लागले. या हाणामारीत ८ कार्यकर्ते जखमी झाले असून शहरात काही काळ तणाव निर्माण झाला होता. महापालिकेच्या निवडणूकीनंतर दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये धुसपुस सुरु होती. त्याचा उद्रेक आज गणेश चतुर्थीच्या दिवशी झाला. सध्या शहरामध्ये तणावपूर्ण शांतता आहे.
[amazon_link asins=’B07D11MDBS,B0785JJF7L’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’8c4658ff-b74f-11e8-9394-d306636852a6′]

मिरज शहरातील बसवेश्वर चौकातून गणेश आगमनाची मिरवणूक जात असताना भाजपचे डॉ. महादेव कुरणे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अभिजीत हारगे या दोन गटात हाणामारी झाली. दोन्ही गटांचे कार्यकर्ते हातामध्ये काठी, दगड घेऊन एकमेकांना भिडले. दोन गटात झालेल्या तुफान हाणामारीत कुरणे गटाचे पाच तर हारगे गटाचे तीन जण जखमी झाले. या घटनेमुळे बसवेश्वर चौकात तणावाचा वातावरण निर्माण झाले होते.
[amazon_link asins=’B01BKEZYBY,B071D4MP9T’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’92c0d3f0-b74f-11e8-969f-eb54070ca5d7′]

नुकत्याच झालेल्या महापालिका निवडणूकीत कुरणे गटाच्या जयश्री कुरणे आणि हारगे गाटाच्या संगीता हारगे यांच्यात चुरशीची लढत झाली होती. या लढतीत हारगे गटाच्या संगीता हारगे या विजयी झाल्या होत्या. निवडणूक निकालानंतर दोन्ही गटामध्ये वेगवेगळ्या कारणावरुन धुसपूस सुरु होती. आज गणपती मिरवणूकीदरम्यान दोन्ही गटात संघर्ष निर्माण होऊन हाणामारीचा प्रकार घडला. या घटनेनंतर शहरात पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.

पोलीसनामाचे फेसबुक पेज लाईक करा.

पोलीसनामाला ट्विटरवर फाॅलो कर.

पोलीसनामाचे युट्यूब चॅनेलला सब्सक्राईब करा.

पोलीसनामाच्या टेलिग्राम चॅनेलला जाॅईन व्हा.