‘या’ समितीसाठी भाजप-सेना युती

अहमदनगर : पोलिसनामा ऑनलाईन – प्रतिष्ठेच्या मानल्या जाणार्‍या स्थायी समितीच्या सभापती पदासाठी शिवसेनेच्या उमेदवाराचा पराभव करण्यासाठी अहमदनगर महापालिकेत भाजप-राष्ट्रवादी-काँग्रेस-बसप अशी महाआघाडी झाल्याचे दिसून आले. स्थायी समितीच्या सभापती शिवसेनेला धावण्यासाठी सर्व पक्ष एकत्र आलेले असताना महिला व बालकल्याण समितीसाठी मात्र भाजप-शिवसेनेची युती झाली. सभापतीपदी भाजपच्या लता शेळके व उपसभापतीपदी शिवसेनेच्या सुवर्णा गेणप्पा हे बिनविरोध विजयी झाल्या.

अहमदनगर महापालिकेत भाजप-काँग्रेस-राष्ट्रवादी-बसपाची महाआघाडी 

महानगरपालिकेच्या महिला व बालकल्याण समितीच्या सभापतीपदी केडगाव भागातून निवडून आलेल्या भाजप नगरसेविका लता शेळके यांची बिनविरोध निवड झाली. उपसभापतीपदी शिवसेनेच्या सुवर्णा गेनप्पा यांचा एकमेव अर्ज दाखल केला होता. या एकमेव समितीमध्ये सेनेमागे पाठबळ नसल्याने भाजप-शिवसेनेची युती पहायला मिळाली. या निमित्ताने केडगाव भागाला सभापतीपदाची प्रथमच संधी मिळाली.

हेही वाचा – मोदींवरील ‘त्या’ डॉक्युमेंट्रीसाठी जाळली चक्क रेल्वेची बोगी 

महिला व बालकल्याण समितीच्या सभापतीपदासाठी भाजपाच्या लता शेळके यांनी तर शिवसेनेच्या पुष्पा बोरुडे यांनी अर्ज दाखल केला होता. मात्र बोरुडे यांनी अर्ज मागे घेतल्याने शेळके बिनविरोध निवडून आल्या. उपसभापतीपदासाठी सुवर्णा गेनप्पा यांचा एकमेव अर्ज होता. त्यामुळे त्यांचीही निवड बिनविरोध घोषित करण्यात आली. त्यामुळे या समितीवर भाजप-शिवसेना यांची युती झाल्याचे दिसून आले आहे. स्थायी समिती सभापतीपदाच्या निवडणुकीत शिवसेनेचा पराभव झाल्याने महिला व बालकल्याण समितीच्या सभापतीपदासाठी शिवसेनेने माघार घेतली. अखेर राज्यात युती झाली असली तरी महापालिकेत मात्र युती पहायला मिळाली नाही.

Loading...
You might also like