हॅलो मी नरेंद्र मोदी बोलतोय ; तुम्हाला हि येऊ शकतो मोदींचा फोन

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – लोकसभा निवडणुका जशा जवळ येऊ लागल्या आहेत अशात प्रचाराची नवीन तंत्रे माध्यमांच्या समोर येऊ लागली आहेत. व्यापक संघटनांच्या जोरावर उत्तर प्रदेश सह महाराष्ट्रात निवडणुकीत विजयी घौडदौड करण्याचा भाजपचा मानस आहे. याच तत्वाला साजेसा उपक्रम भाजप सर्वत्र राबवणार आहे. निवडणुकीच्या काळात मतदारांना फोन करून नरेंद्र मोदी मतदारांशी संवाद साधणार आहेत. अशी चर्चा दिल्लीच्या राजकीय वर्तुळात रंगत आली आहे.

लोकसंख्येच्या आधारावर चार लोकसभा मतदारसंघात एक कॉल सेंटर उभारले जाणार असून मोदी मतदारांशी मोदी फोनवरून संवाद साधत केलेल्या विकास कामांची माहिती देणार आहेत. अर्थात हा फोन कॉल हा रेकॉर्ड कॉल असणार आहे. चार मतदारसंघाचे काम एका कॉल सेंटर वरून चालणार असून लोकांशी संपर्क साधण्याचे चांगले साधन म्हणून भाजप सध्या या प्रणाली कडे बघते आहे.

कॉल सेंटरचे संचलन करण्यासाठी प्रशिक्षित तरुणाची फौज असणार आहे. प्रचार चालू होण्या अगोदर प्रचार सुरु असताना आणि मतदानाला काही दिवस बाकी असताना मतदारांना मोदींचे फोन येणार आहेत. त्याच प्रमाणे मोदी SMS देखील पाठवून आपल्या कामाचा लेखाजोखा मांडणार आहेत. गत निवडणुकीत भाजपला देशभरातून १७ कोटी मते मिळाली होती तर महाराष्ट्रात विधानसभेला ४६.८९ लाख मते भाजपला मिळाली होती. याच आकड्याच्या जवळपास पोहचण्याचा भाजपचा प्रयत्न राहणार आहे. प्रचार सुरु होताच मोदी आपणास फोन करून भाजपच्या उमेदवाराला विजयी करण्याची विनंती करणार आहेत.

भाजपच्या प्रचार फार्म्युल्याची सर्वत्र चर्चा होत असून काँग्रेस देखील तशाच प्रकारचे काही तरी अस्त्र आपणही वापरू शकतो का यावर विचार विनिमय करत आहे. एकंदरच या वर्षीच्या लोकसभा निवडणुकीचा प्रचारा हायटेक होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.