BJP candidate For Rajya sabha | मेधा कुलकर्णी, अशोक चव्हाण आणि डॉ. अजित गोपछडे यांना भाजपकडून महाराष्ट्रात राज्यसभेसाठी उमेदवारी

मुंबई : पोलीसनामा ऑलनाइन – भारतीय जनता पक्षाने (भाजप) महाराष्ट्रातील राज्यसभेसाठी 3 जणांना उमेदवारी दिली आहे. त्यामध्ये मेधा कुलकर्णी, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण आणि डॉ. अजित गोपछडे यांचा समावेश आहे. भाजपकडून याबाबत आज (बुधवार) अधिकृत यादी जाहीर करण्यात आली आहे.

मेधा कुलकर्णी या पुण्याच्या आहेत तर अशोक चव्हाण आणि अजित गोपछडे हे दोन्ही नेते नांदेडमधील आहेत. अशोक चव्हाण यांनी कालच (मंगळवार) भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यावेळी त्यांना राज्यसभेची उमेदवारी मिळेल असे बोलले जात होते. दरम्यान, आज भाजपने राज्यसभेसाठी उमेदवारांची यादी जाहीर केली आहे.

भाजपकडून राज्यसभेसाठी प्रा. मेधा कुलकर्णी यांना संधी देण्यात येणार असल्याबाबतचे वृत्त सर्वप्रथम पोलीसनामा ऑलनाइनने मंगळवारी प्रसिध्द केले होते.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Medha Kulkarni-Pune BJP | प्रा. मेधा कुलकर्णी राज्यसभेवर? ‘या’ कारणामुळे चर्चेला उधाण