लोकसभा उमेदवारीसाठी भाजपमध्ये वाढली चुरस

पुणे : पाेलीसनामा ऑनलाईन

आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने पुण्यात संघटनात्मक तयारी सुरू केली आहे त्याचवेळेस पक्षातील इच्छुकही सक्रीय झाले असून उमेदवारीसाठी चुरस निर्माण झाली आहे.
[amazon_link asins=’B01DDP7D6W’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’1fbe1741-ae9d-11e8-a571-3ff05f3c6689′]

गेल्याच आठवड्यात भाजपने लोकसभा निवडणुकीसाठी संघटकांच्या नियुक्त्या जाहीर केल्या. त्यावर प्रतिक्रिया उमटत असतानाच राज्यसभेतील भाजपचे सहयोगी सदस्य संजय काकडे यांनी लोकसभा उमेदवारीसाठी इच्छुक असल्याचे जाहीर केले. पुणेकरांचे प्रश्न, समस्या सोडविणे याची नैतिक जबाबदारी लोकसभा खासदार झाल्यावर येते त्याकरिता मला निवडणूक लढवायची आहे. अशी भूमिका काकडे यांनी जाहीर केली आणि पक्षासाठी केलेल्या कामामुळे भाजपकडून उमेदवारी नाकारली जाणार नाही असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

उदयनराजेंकडून बापट यांना साताऱ्यातून खासदारकीची ऑफर

उमेदवारीच्या स्पर्धेत काकडे यांनी खुलेपणाने भाग घेतला आहे. भाजपचे विद्यमान खासदार अनिल शिरोळे हे पक्षाकडून पुन्हा संधी मिळावी यासाठी इच्छुक आहेत. गेल्या वर्षी दिवाळी फराळाचे निमित्त करून पालकमंत्री गिरीश बापट यांनी आपणही खासदारकीच्या स्पर्धेत असल्याचे सूचित केले. त्यांचे कार्यकर्तेही त्यादृष्टीने कामाला लागले आहेत. भाजपचे शहराध्यक्ष योगेश गोगावले यांचेही नांव संभाव्य उमेदवार म्हणून पक्षवर्तुळात घेतले जाते. काकडे यांनी आता खुलेपणाने इच्छा व्यक्त केल्याने भाजपमध्ये उमेदवारीसाठी स्पर्धा वाढली आहे.

दि.13 जानेवारी ते 31 ऑगस्ट 2018 या कालावधित 28 लाख 50 हजाराची व्हीव्हरशिप मिळवलेल्या व 15 हजार Subscribes असलेल्या Policenama News या चॅनेला Subscribe करा.

Policenama News