मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – सुधारित नागरिकत्व कायद्याविरोधात देशभरात आंदोलन सुरु आहे. हा कायदा मागे घेण्याची मागणी करत देशभरात लाखो लोक रस्त्यावर उतरले आहे. या कायद्यावरून देशातील वातावरण चांगलेच तापले असताना भाजपने त्यांच्या ट्विटर हँडलवरून एक जुनं ट्विट डिलीट केले आहे. लोकसभा निवडणुकीवेळी भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी केलेल्या विधानाचे हे ट्विट होते. मात्र, गुरुवारी (दि.19) हे ट्विट काढून टाकण्यात आले आहे.
लोकसभा निवडणुकीच्या प्रचारावेळी प्रचार करताना एप्रिल महिन्यात अमित शहांनी एका भाषणादरम्यान NRC नोंदणीवर भाष्य केले होते. आम्ही संपूर्ण देशात राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी लागू करु असे अमित शहा म्हणाले होते. मात्र, याच विषयावर बोलताना त्यांनी केलेले एक विधान वादग्रस्त ठरले होते. बौद्ध, हिंदू आणि शीख यांचा अपवाद वगळता आम्ही सगळ्या घुसखोरांची देशातून हकालपट्टी करू, असे शहा म्हणाले होते. त्यांचं हे विधान भाजपाने ट्विट केले होते. मात्र, काल हे ट्विट डिलीट करण्यात आले आहे. परंतु या ट्विटचे स्क्रिनशॉट्स मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.
अमित शहा यांचे ट्विट डिलीट केल्यावर तृणमूल काँग्रेसचे खासदार डेरेक ओब्रायन यांनी भाजपला चिमटा काढला. भाजपची आयटी सेल ट्विट डिलीट करु शकतं. मात्र गृहमंत्री संसदेत काय म्हणाले, हे त्यांना डिलीट करता येणार नाही, असा टोला ओब्रायन यांनी भाजपला लगावला आहे. त्यानंतर काहींनी बंगाल भाजपाच्या ट्विटर हँडलकडे लक्ष वेधले. बंगाल भाजपाच्या ट्विटर हँडलवर मात्र अद्याप ते ट्विट दिसत आहे.
फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/
- दातदुखी दूर करण्यासाठी ‘या’ तेलाचा होतो फायदा ! ‘हे’ आहे ६ फायदे
- तुम्हाला ‘रेड टी’ माहित आहे का? ‘हे’ आहेत ५ आरोग्यदायी फायदे
- कपड्यांना येणारी दुर्गंधी दूर करण्यासाठी ‘या’ ७ घरगुती टिप्स !
- आठवड्यातून ५ वेळा गरम पाण्याने आंघोळ केल्यास होतो ‘हा’ फायदा
- छोट्या-छोट्या गोष्टींवर रडू येते का? ‘ही’ आहेत ९ कारणे, जाणून घ्या
- ‘योगा’मुळे कमी होते नैराश्याची तीव्रता, ‘हे’ आहेत ५ परिणाम
- भुकेमुळे राग येत असेल तर करा ‘हे’ ५ उपाय, जाणून घ्या