अमृता फडणवीसांची Lockdown वरून पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या…

मुंबई : पोलीसानामा ऑनलाइन – कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे राज्य शासनाने राज्यात कठोर निर्बध लागू केले आहे. यारून अनेक लोकांची प्रतिक्रिया येत असतानाच माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनीही लॉकडाउनवर प्रतिक्रिया दिली आहे. महाराष्ट्रातील रुग्ण आणि मृत्यूदर पाहता जर विचार करुन काही निर्णय घेतला असेल तर आपण त्याचा आदर केला पाहिजे. काही दिवस आपण धीर धरायला हवा. ब्रेक द चेनसाठी हे गरजेचं आहे, तसेच, गरज असल्याशिवाय घराबाहेर लोकांनी पडू नये असं आवाहन देखील अमृता फडणवीस यांनी केलं आहे.

अमृता फडणवीस यांनी राज्य शासनाकडून घेण्यात आलेल्या लॉकडाउनच्या निर्णयाचं समर्थन केलं आहे. तसेच त्यांनी राज्य शासनाकडून पुरेशी तयारी झाली नाही असते त्या म्हणाल्या. गेल्या वर्षीच्या लाटेनंतर यंदाच्या लाटेसाठी पुरेशी तयारी झालेली नाही. आता खूप पाऊलं उचलण्यात आली आहेत. त्यामुळे टंचाई कमी होईल अशी आशा आहे. मात्र, आरोग्याबाबत पायाभूत सुविधांकडे लक्ष देण्यात आलेलं नसून त्यासाठी काम करणं आवश्यक असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

दरम्यान , मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बुधवारी कठोर निर्बधांबाबत निर्णय घेतला. तर अत्यावश्यक सेवा आणि सरकारी कार्यालयीन कर्मचाऱ्यांव्यतिरिक्त मुंबईबाहेरून येणाऱ्या अन्य नागरिकांना शहरात प्रवेश मिळणार नाही. तसेच, केंद्र व राज्य सरकारी कर्मचारी, वैद्यकीय क्षेत्र तसेच मुंबई महानगर क्षेत्रविकास प्राधिकरण क्षेत्रातील महानगरपालिका कर्मचाऱ्यांनाच उपनगरीय रेल्वे प्रवासाला राज्य शासनाने परवानगी दिली आहे. रिझर्व्ह बँक वगळता इतर राष्ट्रीयीकृत आणि खासगी बँका, वित्तीय सेवा किंवा इतर अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांनाही रेल्वेचा वापर करता येणार नाही.