देवेंद्रजी, तुम्हाला लवकरच संधी मिळेल, राष्ट्रवादीच्या नेत्याकडून उत्तर

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – माजी मुख्यमंत्री आणि सध्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी नुकतेच दिल्लीच्या मेट्रोत बसून फोटो काढला होता. तो फोटो ट्विट करत, मुंबई मेट्रोतून कधी प्रवास करता येईल? असा खोचक सवाल त्यांनी महाविकास आघाडी सरकारला विचारला होता. त्यावर देवेंद्रजी, तुम्हाला लवकरच संधी मिळेल, असे उत्तर राष्ट्रवादीचे प्रदेश प्रवक्ते महेश तपासे यांनी दिले आहे.

 

 

 

 

 

मुंबई मेट्रो-3 हा प्रकल्प महाविकास आघाडी सरकार पूर्ण करेल यात शंका नाही. परंतु केंद्राकडून वारंवार अडथळा निर्माण केला जात आहे, अशी मुंबईकरांची भावना आहे. त्यामुळे केंद्रासोबत आपण जर संवाद साधलात तर प्रकल्प लवकर पूर्ण होऊ शकेल आणि तुम्हालाही मुंबई मेट्रो-3 मध्ये प्रवास करण्याची व फोटो काढून ट्वीट करण्याची लवकरच संधी मिळेल, असे उत्तर तपासे यांनी फडणवीस यांना दिले आहे. फडणवीस यांना फोटो काढून ट्वीट करण्याची व फिरण्याची संधी मिळावी ही मुंबईकरांचीही अपेक्षा आहे. परंतु वारंवार केंद्राकडून मदतीऐवजी आडकाठी होत आहे. असे प्रकार थांबले तर मुंबईकरांना लवकर दिलासा मिळेल असेही तपासे यांनी नमूद केले आहे.