भारतीय जनता पार्टी नव्हे तर भारतीय जुमला पार्टी – आ. अमित देशमुख 

 हे भाजपा चे वचनपत्र नव्हे हे संकट पत्र आहे?  काम्हणाले अमित देशमुख वाचा सविस्तर

लातूर : विष्णू बुरगे –  मुख्यमंत्र्यांच्या सभेने दिल्लीची नाही तर गल्लीची निवडणूक करून टाकली. स्तर सोडून त्यांनी राहुल गांधींवर टीका केली आहे. राहुल गांधी एकटे आहेत म्हणून टीका करत आहेत. तुम्ही टीका करत राहा राहुल गांधी देश जिंकत राहतील. आज मोदी यांची सभा झाली. त्यात ते वचनपत्रावर बरच काही बोलले. मात्र हे भाजपाचे वचनपत्र नव्हे हे संकट पत्र आहे. असं वक्तव्य आमदार अमित देशमुख यांनी प्रचार सभेत केलं. टाऊन हॉल येथे मच्छिंद्र कामत यांच्या प्रचार सभा आयोजित करण्यात आली होती.

शिवसेना मोठा भाजपा लहान म्हणत ज्यांनी गोंधळ केला. निवडणुका येताच ते गळ्यात गळे घालून दिशाभूल करत आहेत. आता ना देवेंद्र ना नरेंद्र लातूरात ओन्ली मच्छिंद्र राहतील. चोवीस तास पाणी देऊ म्हणणारे आज महिन्याला पाणी देत आहेत. त्यावर काही बोलत नाहीत. सामान्य माणसांनी ही निवडणूक हातात घेतली पाहिजे. दोन्ही सरकारला निरोप देण्याची वेळ आली आहे. भारतीय जनता पार्टी नव्हे तर भारतीय जुमला पार्टी भाजपा बनत चालली आहे. म्हणून आता काँग्रेस हा पर्याय असल्याचं ते म्हणाले.

 

Loading...
You might also like