सरकारी अधिकाऱ्यांच्या ड्रेसकोडवरून भाजपच्या ‘या’ नेत्यानं आदित्य ठाकरेंना घेरलं

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – शासकीय कार्यालयात (Government Employee) काम करणाऱ्या अधिकारी (Officer) आणि कर्मचाऱ्यांना कार्यालयात जिन्स किंवा टी-शर्ट (T-Shart) वापरण्यास बंदी घातली आहे. तसेच त्यांनी कोणते कपडे वापरावेत याबाबतची मार्गदर्शिका (Guideline) लागू केली आहे. मात्र, यावरून भाजपच्या (BJP) अध्यात्मिक समन्वय आघाडीचे प्रदेशाध्यक्ष आचार्य तुषार भोसले (Aacharya Tushar Bhosale) यांनी पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांच्यावर निशाणा साधला आहे.

अधिकारी आणि कर्मचारी यांच्या पोशाखाबाबत राज्य शासनाने नुकताच घेतलेला निर्णय स्वागतार्हच आहे. मात्र, शासकीय यंत्रणांचे प्रमुख असलेल्या मंत्र्यांना देखील हा निर्णय बंधनकारक असावा. राज्याच्या पर्यटनमंत्र्यांनी खासगी पर्यटनाच्या ‘दिशेला’ जाताना जीन्स घालावी, सरकारी कामकाजात नव्हे, अशा शब्दांत आचार्य तुषार भोसले यांनी टोला लगावला आहे.

मंत्रालयात काम करणाऱ्या शासकीय कर्मचारी आणि कंत्राटी कर्मचाऱ्यांना पोषाखाबाबत मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत. या नुसार मंत्रालयात जीन्स, टी-शर्ट घालता येणार नाही. तसेच मंत्रालयात स्लीपर्स वापरु नये, असंही नव्या नियमात म्हटलं आहे. महिलांनी साडी, सलवार चुडिदार, पॅन्ट, ट्राऊझर आवश्यक असल्यास दुपट्टा घालावा. तर पुरुषांनी शर्ट पॅन्ट, ट्राऊझर घालावे, असं जारी करण्यात आलेल्या मार्गदर्शक सूचनांमध्ये नमुद करण्यात आले आहे.

आणखी काय आहेत सूचना ?

– जीन्स आणि टी-शर्ट घालू नये
– गडद रंगाचे चित्र विचित्र नक्षीकाम चित्र असलेले कपडे परिधान करु नये
– आठवड्यातील एक दिवस शुक्रवारी खादीचे कपडे परिधान करावे.

अध्यादेश लागू
सर्व शासकीय कार्यालयात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना कार्यालयात घालण्यात येणाऱ्या कपड्याला देखील आता ड्रेस कोड लागू करण्यात आला आहे. याबाबत राज्य सरकारनं 8 डिसेंबर रोजी अध्यादेश जारी केला आहे.