Ashish Shelar | राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाकडून राज्य सरकारला 12 हजार कोटींचा दंड, आशिष शेलारांनी साधला आदित्य ठाकरेंवर निशाणा

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाने (National Green Tribunal) महाराष्ट्र सरकारला (Government of Maharashtra) तब्बल 12 हजार कोटी रुपयांचा दंड (Penalty) ठोठावला आहे. पर्यावरणाचे नियम न पाळल्याबद्दल शिंदे सरकारला (Shinde Government) हा दंड ठोठावण्यात आला आहे. न्यायमूर्ति आदर्श कुमार गोयल (Justice Adarsh Kumar Goyal) यांनी राष्ट्रीय हरित लवाद कायद्याच्या कलम 95 अंतर्गत हा दंड ठोठावला आहे. यावरुन भाजप (BJP) नेते आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी तत्कालीन पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांच्यावर निशाणा साधला आहे. आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन याबाबत दोन ट्विट केले आहेत.

‘सोशल मीडियावर’ पर्यावरण प्रेमाची झाडे लावणाऱ्या’ पेंग्विन (Penguin) सेना प्रमुखांकडून हा दंड वसूल करायचा का?’ असं म्हणत आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी बोचरी टीका केली आहे. कचरा व्यवस्थापनात (Waste Management) अपयशी ठरल्याने पर्यावरणाची हानी केल्याबद्दल राष्ट्रीय हरित लवादाने महाराष्ट्र सरकारला 12 हजार कोटींचा दंड ठोठावला आहे. प्रदूषणमुक्त (Pollution) वातावरण देणे ही राज्य सरकार आणि स्थानिक स्वराज्य संस्थांची घटनात्मक जबाबदारी आहे, असे लवादाने म्हटले आहे.

‘हा दंड दोन महिन्यात भरायचा आहे, मग आता… सांग सांग भोलानाथ… हा दंड पालिकांमध्ये (BMC) सत्ता असलेल्यांकडून… अडीच वर्ष पर्यावरण मंत्री असलेल्यांकडून… सोशल मीडियावर ‘पर्यावरण प्रेमाची झाडे लावणाऱ्या’ पेंग्विन सेनाप्रमुखांकडून वसूल करायचा का?’ असं शेलार यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे. हरित लवादाच्या म्हणण्यानुसार पर्यावरणाची हानी केल्याबद्दल हा दंड ठोठावण्यात आला आहे. तसेच महाराष्ट्र सरकार घन आणि द्रव कचऱ्याचे व्यवस्थापन करण्यात अपयशी ठरल्याचंही म्हटलं आहे.

Web Title :- bjp leader ashish shelar slams shivsena aaditya thackeray over 12000 crore rupees compensation National Green Tribunal (NGT)

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Pune Crime | जप्त मालमत्तेचा बँक मॅनेजरनेच केला अडीच कोटींचा अपहार; लोणीकंद पोलीस ठाण्यात FIR

RBI ने रद्द केले पुण्यातील ‘या’ बँकेचे लायसन्स, तुमचे सुद्धा असेल खाते; तर काढू शकणार नाही पैसे

Employee Pension Scheme | पेन्शनसाठी पीएफ अकाऊंटमध्ये केव्हापर्यंत करावे लागेल योगदान? जाणून घ्या फायद्याची बाब