Chandrakant Patil in Pune : ‘कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावावर Lockdown हे उत्तर नाही, मुख्यमंत्र्यांनी झोपडपट्टीत फिरावे’

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन –   दिवसेंदिवस कोरोनाच्या वाढता प्रभाव रोखण्यासाठी लॉकडाऊन हे उत्तर नाही. कोरोना संसर्गजन्य आजार आहे. पण त्याचे नियम पाळूनही तुम्ही घरी बसायला सांगत असाल तर ते शक्य नाही. आम्ही लॉकडाऊनला कडाडून विरोध करू असा इशारा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिला आहे. आता जर लॉकडाऊन केले तर तुम्ही एक रुपयांचेही पॅकेज देणार नाही. वर्षभर लोक कसे जगले, ते तुम्हाला मातोश्रीत बसून कळणार नाही. त्यासाठी ठिकठिकाणी फिरावे लागेल असा टोलाही पाटील यांनी लगावला आहे.

चंद्रकांत पाटील म्हणाले की, तुम्ही झोपडपट्ट्यांमधून फिरून पहा, त्या ठिकाणी प्रत्येकजण काही ना काही तरी करुनच पोट भरतो. त्यांना तुम्ही काहीही दिले नाही. काळजी घेऊन लोकांनी नित्याचे व्यवहार केले पाहिजेत, असेही पाटील म्हणाले. ज्यांना नाईट लाईफ हवी आहे, ते तुमच्यासोबत आहेत, अशी खोचक टीकाही पाटील यांनी केली आहे. सर्वसामान्यांना नाईट लाईफ नको. त्यांना सातच्या आत घरात जायचे असते. दिवसभराचे दिनक्रम चालूच राहिले पाहिजेत. चाचण्या वाढवणे गरजेचे आहे. ज्याला काहीही लक्षण नाहीत अशा लोकांच्या चाचण्या करा, त्यामुळे रुग्ण लवकरत कळतील, त्यामुळे संसर्ग वाढणार नाही, असे पाटील म्हणाले.