देशमुखांच्या राजीनाम्यानंतर चित्रा वाघ यांचा सवाल; म्हणाल्या – ‘आता नवा वसुली मंत्री कोण?’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –   राज्याचे ग्रहमंत्री अनिल देशमुख यांनी अखेर आज गृहमंत्री पदाचा राजीनामा दिला आहे. या राजीनाम्यानंतरही भाजप पक्षाकडून अनेक जोरदार टीका होत आहे. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी अखेर राजीनामा दिला. परंतु, आता प्रश्न उरतो की, नवा वसुली मंत्री कोण? असा घणाघाती प्रश्न भाजपच्या प्रदेश उपाध्यक्ष चित्रा वाघ यांनी ठाकरे सरकारवर केला आहे.

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी अनिल देशमुख यांच्यावर केलेल्या १०० कोटींच्या वसुलीच्या आरोपांच्या प्रकरणात उच्च न्यायालयाने आज CBI चौकशीचे आदेश दिले. त्यानंतर देशमुख यांनी गृहमंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. तर यावरून चित्रा वाघ यांनी राज्य सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. मंत्रिमंडळातील एखादा चेहरा बदलल्याने महाविकास आघाडी सरकारचा भ्रष्ट हेतू काही बदलणार नाही, अशी जोरदार टीका देखील चित्रा वाघ यांनी केली आहे.

दरम्यान, मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या निकालानंतर अनिल देशमुखांनी राजीनामा दिला. उशिरा का होईना त्यांनी राजीनामा दिला. महाविकास आघाडीचं हे सरकार जनतेच्या मनातलं सरकार नाही. हे आता सव्वा वर्षानंतर राज्यातील जनताच अनुभवत आहे. यांनी महाराष्ट्राच्या प्रतिमेला काळं फासण्याचं काम केलं आहे, अशी जोरदार टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.