BJP Leader Keshav Upadhye | केशव उपाध्येंचा जोरदार निशाणा; म्हणाले – ‘मुख्यमंत्रीपदासाठी पवार-गांधींकडे हिंदुत्व गहाण ठेवलं’

0
18
BJP Leader Keshav Upadhye hindutva mortgaged to pawar gandhi for cm post bjp leader keshav upadhye lashes out shiv sena
file photo

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – BJP Leader Keshav Upadhye | राज्यातील मागील अनेक दिवसांपासून सत्ताधारी महाविकास आघाडी सरकार (Mahavikas Aghadi Government) आणि भाजप (BJP) यांच्यात राजकीय शीतयुद्ध चांगलंच रंगलं असल्याचे दिसत आहे. तर सध्या हनुमान चालीसा (Hanuman Chalisa) आणि मशिदीवरील भोग्यांमुळे (Loudspeaker) आणखी राजकारण तापल्याचं दिसत आहे. शिवसेनाही (Shivsena) हिंदुत्वाच्या मुद्द्यावरुन भाजपवर हल्लाबोल करत आहे. याच मुद्यावरुन आता भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये (BJP Leader Keshav Upadhye) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे.

 

”भाजपावर तुटून पडा, असे आदेश वर्क फ्रॉम होम करणाऱ्या मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सेना प्रवक्त्यांना नुकतेच दिलेत म्हणे. त्यात भाजपचे हिंदुत्व खोटं ठरवण्यासही सांगितलंय. पण ज्यांचं हिंदुत्व मुख्यमंत्रीपदासाठी पवार-गांधींकडे गहाण पडलंय. ज्यांचा हिंदुत्वाशी संबंध केवळ बोलण्यापुरता राहिलाय. त्यांनी भाजपच्या हिंदुत्वावर बोलूच नये,” अशी जोरदार टीका केशव उपाध्ये यांनी फेसबूकवरुन केली आहे.

पुढे बोलताना केशव उपाध्ये म्हणाले, “हिंदुत्व भाजपासाठी आत्मा आहे. तुमच्यासारखं गरज असेल तेव्हा वापरलं आणि नसेल तेव्हा सोडून दिलं, असलं आम्ही कधी केलं नाही. म्हणूनच राम मंदिर, कलम 370 सारखे मुद्दे आम्ही मार्गी लावले. आज तुम्ही हिंदुत्वाला अनुकूल अशी कुठलीही भूमिका घेतलीत तर तुमच्या सरकारच्या कुबड्या पवार आणि सोनिया गांधी झटकन काढून घेतील, म्हणूनच तुम्ही त्यांना सोईस्कर अशाच भूमिका घेताय, त्यात हिंदू हित शून्य आहे.” असं ते म्हणाले.

 

दरम्यान, ”थोडक्यात तुमच्या हिंदुत्वाची अवस्था दात आणि नखे काढलेल्या वाघासारखी झालीय.
तो केवळ डरकाळ्या फोडू शकतो, त्याकडून बाकी काही होणे शक्य नाही.
तुमच्या नाकर्त्या कारभारामुळे तुमचे कार्यकर्ते तुमच्यापासून ‘तुटले’ आहेतच. ‘पडा’यचे बाकी आहे, ते निवडणुकीत होऊन जाईल,”
असं देखील केशव उपाध्ये यांनी म्हटलं आहे.

 

Web Title :- BJP Leader Keshav Upadhye | hindutva mortgaged to pawar gandhi for cm post bjp leader keshav upadhye lashes out shiv sena

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा