BJP Leader Nilesh Rane | फोटो पोस्ट करत निलेश राणेंचा शिवसेनेला टोला; म्हणाले – “शिवसेनेचा 56 वा वर्धापन दिवस किती उत्साहात…”

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – BJP Leader Nilesh Rane | शिवसेनेचा 56 वा वर्धापनदिन काल (रविवारी) पार पडला. त्यावेळी शिवसेना पक्षप्रमुख आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी शिवसेनेच्या आमदारांना मार्गदर्शन केले. त्यातच विधान परिषदेच्या पार्श्वभूमीवरही सूचना दिल्या. त्यावेळी त्यांनी भाजपवर (BJP) जोरदार निशाणा साधला आहे. याच कार्यक्रमावरुन आता भाजपचे माजी खासदार निलेश राणे (BJP Leader Nilesh Rane) यांनी शिवसेनेवर (ShivSena) जोरदार टीका केली आहे. निलेश राणेंनी कार्यक्रमातील काही फोटो शेअर करताना शिवसेना आणि खासदार विनायक राऊत (MP Vinayak Raut) यांना लक्ष्य केलं आहे.

 

उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिक, पदाधिकारी व लोकप्रतिनिधींची बैठक घेतली. आपल्याच पक्षाच्या आमदारांनी आपल्याच उमेदवारांना मते द्यावीत, यासाठी त्यांना एकत्र ठेऊन बडदास्त ठेवायची हीच आजची लोकशाही आहे, असं ते म्हणाले. तसेच, विधान परिषद निवडणुकीतही (Maharashtra Legislative Council Elections) आमच्यात फूट पडू शकत नाही, हे देशाला दाखवायचे आहे. महाराष्ट्राच्या शहाणपणापुढे तुमचा सत्तेचा माज चालणार नाही,’ असा इशारा भाजपाला देत विधान परिषद निवडणुकीत विजय निश्चित असल्याचा विश्वासही उद्धव ठाकरेंनी केला. यानंतर निलेश राणेंनी शिवसेनेच्या या कार्यक्रमावर टीकास्त्र सोडलं आहे.

 

निलेश राणे यांनी ट्विट केलेल्या 4 फोटोंमध्ये उद्धव ठाकरे संवाद साधत असताना त्यांच्या मागील बाजूला मंचावर बसलेले शिवसेनेचे खासदार विनायक राऊत हे वेगवेगळे हावभाव करत असल्याचं दिसत आहे, हातातील घड्याळाकडे पाहत असल्याचं दिसत आहे. हेच फोटो ट्विट करत निलेश राणेंनी, “शिवसेनेचा 56 वा वर्धापन दिवस किती उत्साहात पार पडला, बघायचं असेल तर पक्षप्रमुखाच्या मागचे बघा,” असा टोला त्यांनी लगावला.

 

दरम्यान, “मुख्यमंत्र्याने जाहीर केला 56 चा नवीन पाढा, 56… 156… 256… आहेत असे पण विचारवंत,” म्हणतही ट्विटरवरुन शिवसेनेच्या या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमातील भाषणावर निलेश राणेंनी टीका केली आहे.

 

Web Title :- BJP Leader Nilesh Rane | bjp leader nilesh rane slams shivsena with these four photos from party foundation day program

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा