Maharashtra MLC Election-2022 | पुण्याच्या भाजपा आमदार मुक्ता टिळक मतदानासाठी मुंबईकडे रवाना; म्हणाल्या…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Maharashtra MLC Election-2022 | विधान परिषदेच्या 10 जागांसाठी आज मतदान (Maharashtra MLC Election-2022) होत आहे. ही निवडणूक सर्वच राजकीय पक्षांनी प्रतिष्ठेची केली आहे. तर राज्यसभा निवडणुकीसाठी पुणे जिल्ह्यातील भाजपाचे आमदार लक्ष्मण जगताप (BJP MLA Laxman Jagtap) आणि मुक्ता टिळक (BJP MLA Mukta Tilak) या दोघांनीही आजारी असताना देखील रुग्णवाहिकेने मुंबई पर्यंतचा प्रवास करुन मतदानाचा हक्क बजावला होता. या 2 मतांमुळे राज्यसभेवर खासदार निवडून गेलेल्या धनंजय महाडिक (Dhananjay Mahadik) यांचा विजय झाला. आता विधान परिषदेच्या मतदानासाठी मुक्ता टिळक सकाळीच पती शैलेश टिळक (Shailesh Tilak), मुलगा कुणाल टिळक (Kunal Tilak) यांच्यासोबत मुंबईच्या दिशेने रवाना झाल्या आहेत.

 

आज (सोमवारी) सकाळी साडेसहाच्या सुमारास मुक्ता टिळक पुण्यामधून मुंबईच्या दिशेने रवाना झाल्या आहेत, त्यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना भावना व्यक्त केल्या आहेत. मुक्ता टिळक या कर्करोगाशी झुंज देत असून राज्यसभेच्या मतदानाच्या वेळेस देखील त्या अशाचप्रकारे सकाळी सकाळी मतदानासाठी मुंबईला रवाना झाल्या होत्या.

मुक्ता टिळक म्हणाल्या, “पक्षाने दिलेला आदेश पाळायचा, हे आमच्या रक्तामध्ये भिनलेलं आहे. त्यामुळे मी आज मतदानाला जात आहे. तसेच राज्यसभा निवडणुकीत आमचे उमेदवार विजयी झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यासोबत बोलणे झाले. त्यावेळी त्यांनी माझे आभार मानले,” तसेच, “पक्षातील सर्वचजण काळजी घेतात. त्यामुळे विशेष महत्व वाटतं,” असं देखील त्या म्हणाल्या.

 

Web Title :- Maharashtra MLC Election-2022 | maharashtra mlc election
bjp mla mukta tilak goes to mumbai for voting

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा