‘PM युद्धभूमीवर पोहोचले, पण महाराष्ट्राचे CM कोकणात जाऊ शकले नाही’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –   पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (शुक्रवार) अचानक लेह दौरा करून सर्वांना आश्चार्याचा धक्का दिला. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लेह लडाख सीमारेषेवर जाऊन देशातील जवानांचे मनोबल वाढविण्याचं काम केलं आहे. तसेच भारत आणि चीन तणावाच्या पार्श्वभूमीवर नरेंद्र मोदींचा लेह दौरा अतिशय महत्त्वाचा मानला जात आहे. नरेंद्र मोदींच्या याच दौऱ्यावरून भाजपने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना टोला लगावला आहे.

भाजपचे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी एक ट्विट करून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. प्रवीण दरेकर यांनी ट्विटमध्ये लिहले आहे की, देशाचे PM लेह युद्धभुमीवर पोहचले, पण महाराष्ट्राचे Best CM कोकणात देखील नाही जाऊ शकले !!!. असे ट्विट करून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना टोला लगावला आहे. आता शिवसेना याला कसे प्रत्युत्तर देते हे पहावे लागेल.

भारत-चीन सीमेवर झालेल्या हिंसक झटापटीत भारताचे 20 जवान शहीद झाले होते. त्यानंतर भारत-चीन दरम्यान तणावाची स्थिती निर्माण झाली होती. चीनबाबत केंद्र सरकार घेत असलेल्या भूमिकेवरून विरोधी पक्षाने केंद्र सरकारवर टीकेची झोड उठवली होती. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज लेह युद्धभूमीवर जाऊन भारतीय सैन्याची भेट घेऊ त्यांचे मनोबल उचावण्याचा प्रयत्न केला आहे.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like