BJP Maharashtra And Sharad Pawar | ‘तुम्ही अजूनही साडेतीन जिल्ह्यातच…’, BJP कडून शरद पवारांना जोरदार प्रत्युत्तर

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – BJP Maharashtra And Sharad Pawar | राज्यात भाजपचं सरकार (BJP Government) येऊ देणार नाही, असं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांनी केले आहे. राष्ट्रवादीच्या युवा आमदारांनी (MLA) काल शरद पवार यांची सिल्व्हर ओक (Silver Oak) या ठिकाणी भेट घेतली. यावेळी आमदारांनी पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांवरुन (Assembly Elections) चर्चा केली. यावेळी शरद पवारांनी घाबरण्याची गरज नाही, आम्ही राज्यात भाजपचं सरकार येऊ देणार नाही, असे विधान केले होते. शरद पवारांच्या याच विधानावर महाराष्ट्र भाजपने जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. यासंदर्भात महाराष्ट्र भाजपच्या अधिकृत ट्विटर हँडलवर तीन ट्विट करण्यात आले आहेत. (BJP Maharashtra And Sharad Pawar)

 

महाराष्ट्र भाजपने ट्विट करत म्हटलं, आदरणीय शरद पवार जी, कोण येणार ? कोण नाही हे सर्व महाराष्ट्रातील जनता ठरवते. लोकशाहीत (Democracy) जनता सर्वश्रेष्ठ असते, तुम्ही नाही. जनतेने भाजपला 105 जागा दिल्या. तुम्ही पावसात भिजूनही त्याच्या अर्धे आमदारही निवडून आणू शकला नाहीत. जनमताचा अनादर करणाऱ्यांना जनता योग्य वेळी धडा शिकवेल. (BJP Maharashtra And Sharad Pawar)

 

महाराष्ट्र भाजपने आणखी एक ट्विट केले आहे. यामध्ये म्हटले की, आदरणीय शरद पवार साहेब, भाजपची काळजी करु नका ! स्वत:च्या पक्षाचे 60 च्या वर आमदार निवडून आणा. इतर प्रादेशिक पक्षांनी (Regional Parties) 10 वर्षात दोन राज्यात सत्ता स्थापन केली आहे, तुम्ही अजून साडे तीन जिल्ह्यातच अडकलात. 55 वर्षांच्या राजकीय कारकिर्दीत (Political Career) स्वत:च्या पक्षाचा मुख्यमंत्री (CM) बनवून दाखवा.

तिसऱ्या ट्विटमध्ये भाजपने काही प्रश्न मांडले आहेत. तसेच शरद पवारांना हे प्रश्न सोडवून दाखवा असे आवाहन केले आहे. भाजपने ट्विट केलंय की, भाजपला येऊ न देण्याच्या गोष्टी नंतर करा. आधी हे प्रश्न सोडवून दाखवा !

राज्यात एसटी (ST) बंद, 6 महिन्यापासून कर्मचारी संपावर (Employees Strike) आहेत.

राज्यात शेतकऱ्यांची वीज (Power) तोडली जात आहे, पिकं उभं उभं करपून जात आहेत.

मराठा (Maratha Reservation), OBC आरक्षणाचा (OBC Reservation) प्रश्न सोडवून दाखवा.

 

भाजपच्या नेत्यांकडून शिकण्यासारखे – शरद पवार
भाजप जरी आपला राजकीय प्रतिस्पर्धी असला, तरी भाजपमधील काही नेत्यांकडून शिकण्यासारखं बरच काही आहे,
असं शरद पवार यांनी युवा आमदारांना बोलताना सांगितलं.
ते म्हणाले, महत्त्वाची बाब म्हणजे, दिवसाला 24 तास काम करण्याचीही तयारी, योजनांची आखणी आणि निवडणुकांसाठी आखण्यात आलेली रणनिती यांसारखे अनेक गुण आहेत.
जे भाजप नेत्यांकडून शिकण्याची गरज आहे.
त्यासोबतच शरद पवारांनी युवा आमदारांना को – ऑपरेटिव्ह सेक्टर आणि सामाजिक क्षेत्रांशी जोडण्याचाही मंत्र दिला आहे.

 

Web Title :- BJP Maharashtra And Sharad Pawar | bjp maharashtra on sharad pawar statement maharashtra bjp has responded to statement of sharad pawar

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा